लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या अहमदपूर तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी जिल्हा महासचिव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, लातूर शहर अध्यक्ष, शहर कार्यकारिणी, अहमदपूर तालुका अध्यक्ष व तालुका कार्यकारिणी, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित बैठकीत पक्षाच्या आगामी संघटनात्मक योजना, जनसंपर्क वाढवणे, युवक व महिलांना नेतृत्वात आणणे, वंचितांच्या प्रश्नांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेत लोकांपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.या कार्यालयाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे काम अधिक गतीने व प्रभावीपणे राबविले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.