Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात वंचित आक्रमक; संजय चौरपगार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 1, 2025
in बातमी
0
दर्यापूर नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

दर्यापूर नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

दर्यापूर : दर्यापूर नगरपालिकेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत विकासकामे रखडली असून, नागरिकांना अजूनही योग्य सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांत संतापाची भावना आहे. नगरपालिका प्रशासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर संकलन करते, मात्र नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

नियमित कर न भरल्यास फौजदारी गुन्ह्यांची धमकी देणारे नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या विश्वासाला तडा देत आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी दर्यापूर येथील उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांची भेट घेऊन नगरपरिषदेच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी अधिकाऱ्यांना ठोस शब्दांत जाब विचारत नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली.

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात शहरातील पाणीटंचाई, खड्डेमय रस्ते, अपूर्ण गटारी, कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा यांसारख्या मुद्द्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. संजय चौरपगार यांनी सांगितले की, “नागरिकांच्या पैशातून प्रशासन चालते आणि त्यांनाच सुविधा न मिळणे म्हणजे प्रशासनाचा अपमान आहे. जर लवकरात लवकर सुधारणा झाल्या नाहीत तर आंदोलन छेडले जाईल.”

Tags: Daryapurvbaforindiaनगरपालिका प्रशासनवंचित
Previous Post

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण महाराष्ट्र राज्य मानवाधिकार हक्क आयोगाकडे सुनावणी : पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी

Next Post

भाषा सक्तीविरोधी लढ्यात वंचित बहुजन आघाडी मैदानात; दिशा पिंकी शेख करणार प्रतिनिधित्व

Next Post
तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधातील सभेस वंचित बहुजन आघाडीचा सक्रीय सहभाग; दिशा पिंकी शेख करतील प्रतिनिधित्व

भाषा सक्तीविरोधी लढ्यात वंचित बहुजन आघाडी मैदानात; दिशा पिंकी शेख करणार प्रतिनिधित्व

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बातमी

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
April 30, 2026
0

Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025...

Read moreDetails
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

April 28, 2026
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home