लाडकी बहिण योजने बाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता काही महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये अशी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. मात्र, अजूनही याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. तारीख बाबत लवकरच निर्णय घेतले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता दिला जाणार नाहीये. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहे.
या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. या योजनेचा निकषाबाहेर जाऊन कोणी लाभा घेतला असेल तर त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहेत. लाखो महिलांना आतापर्यंत या योजनेतून बाद करण्यात आले आहेत.
या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही –
- २१ ते ६० वोयगटातील महिला या योजनेचा लाभ घेत शकतील.
- लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनादेखील योजनेचा लाभ मिळणार नाही
- महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
- महिलांकडे चारचाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही
लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अनेक फ्रॉड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली आहे. त्यातील अनेक महिला या सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.