Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, 12 ते 16 जून मुसळधार पावसाची शक्यता

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, 12 ते 16 जून मुसळधार पावसाची शक्यता
       
मुंबई – राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे. दरम्यान 12 ते 16 जून या कालावधीत राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही वेधशाळेने म्हटले आहे. मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असून कोकण आणि गोवा येथे 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालकांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या 3 ते 4 दिवसांत आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 12 जून रोजी मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा येथे 12 आणि 15 जून दरम्यान मुसळधार तर 13 ,14 जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान वेधशाळेच्या संचालकांनी नागरिकांनी सतर्क रहावे असे म्हटले आहे. तसेच सतर्कतेबाबत विविध सुचना देखील केल्या आहेत. 12 ते 16 जून या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये. वीजांच्या गडगडाटांसह वादळ होत असताना नागरिकांनी खुल्या मैदानावर काम करु नये, वीजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, वीजेची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज पुरवठा खंडित करुन ठेवावीत, ओढा, तलाव, नदी आदी पाण्याच्या स्त्रोतातून तत्काळ बाहेर पडावे, वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना वेधशाळेच्या संचालकांनी दिल्या आहेत.

Tags: heavyJune 12 to 16likelyMaharashtraMonsoonrainsreactivatestatewill
Previous Post

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचितची माढा लोकसभा विभाग आढावा बैठक

Next Post

समता महिला शेतकरी गटाने मिळवले आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे बक्षीस, वंचितने केला सत्कार

Next Post
समता महिला शेतकरी गटाने मिळवले आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे बक्षीस,  वंचितने केला सत्कार

समता महिला शेतकरी गटाने मिळवले आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे बक्षीस, वंचितने केला सत्कार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
चेंबूरमध्ये बिल्डर सुशील रहेजाकडून बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
बातमी

चेंबूरमध्ये बिल्डर सुशील रहेजाकडून बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

by mosami kewat
February 4, 2026
0

मुंबई: मुंबईतील चेंबूर परिसरात रहेजा बिल्डरने आपल्याच बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कागदपत्रे...

Read moreDetails
वंचितला एक संधी द्या, गावांचा कायापालट करू; रांजणगावच्या सभेत सुजात आंबेडकरांचे आवाहन

वंचितला एक संधी द्या, गावांचा कायापालट करू; रांजणगावच्या सभेत सुजात आंबेडकरांचे आवाहन

February 4, 2026
वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह

वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह

February 4, 2026
सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

February 4, 2026
खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन

खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन

February 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home