Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

बकरी ईदनिमित्त दिली ६० वर्षीय व्यक्तीने स्वतःची कुर्बानी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 8, 2025
in Uncategorized
0
बकरी ईदनिमित्त दिली ६० वर्षीय व्यक्तीने स्वतःची कुर्बानी
       

उत्तर प्रदेश, देवरिया – उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 60 वर्षीय व्यक्तीने बकरी ईदनिमित्त स्वतःची कुर्बानी देऊन जीव दिला आहे. इश मोहम्मद असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने एक सुसाईड नोट लिहून गळा चिरून आत्महत्या केली आहे.

ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त प्राण्यांची कुर्बानी दिली जाते, मात्र उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील ६० वर्षीय इश मोहम्मद याने स्वतःला बलिदान म्हणून अर्पण केले आणि गळा कापून आत्महत्या केली. ही घटना देवरिया जिल्ह्यातील गौरी बाजार पोलीस स्टेशन परिसरातील उधोपूर गावातील आहे. वृत्तानुसार, इश मोहम्मद सकाळी ईदची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेला होता. आणि सकाळी १० वाजेच्या सुमारास घरी परतला. त्यानंतर त्याने आत्महत्या केली.

पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात लिहिले आहे, “एक माणूस बकरीला आपल्या मुलासारखे वाढवून बकऱ्याची बलिदान देतो. तो देखील एक जिवंत प्राणी आहे, बलिदान दिले पाहिजे. मी अल्लाहच्या पैगंबराच्या नावाने स्वतःची बलिदान देत आहे. मला शांततेत दफन करा, कोणाचीही भीती बाळगू नका.” पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सुसाईड नोटची चौकशी केली जात आहे. त्याने हे कृत्य मानसिक तणावाखाली केले आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.


       
Tags: 60-year-oldEIDhimselmansacrifices
Previous Post

छत्तीसगड बीजापूर जिल्ह्यातील चकमकीत 5 नक्षलवादी ठार

Next Post

भाजप आणि काॅग्रेसच्या युतीवर पत्रकार, माध्यमं कधी व्हिडीओ बनवतील – अॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post
भाजप आणि काॅग्रेसच्या युतीवर पत्रकार, माध्यमं कधी व्हिडीओ बनवतील – अॅड. प्रकाश आंबेडकर

भाजप आणि काॅग्रेसच्या युतीवर पत्रकार, माध्यमं कधी व्हिडीओ बनवतील - अॅड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश
बातमी

मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश

by mosami kewat
July 29, 2025
0

मंगळवेढा : वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने मंगळवेढा येथे युवा तालुका आणि शहर कार्यकारिणीच्या बांधणी व निवडीसाठी...

Read moreDetails
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आरक्षणाशिवाय भरती, १० लाखांचा बॉन्ड अट; जाहिरात रद्द करण्याची वंचितची मागणी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आरक्षणाशिवाय भरती, १० लाखांचा बॉन्ड अट; जाहिरात रद्द करण्याची वंचितची मागणी

July 28, 2025
दिव्या देशमुखने पटकावले FIDE महिला विश्वचषक २०२५ चे विजेतेपद!

दिव्या देशमुखने पटकावले FIDE महिला विश्वचषक २०२५ चे विजेतेपद!

July 28, 2025
‎'संविधान का बदलावे?' या नावाने पुस्तक प्रकाशित करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

‎’संविधान का बदलावे?’ या नावाने पुस्तक प्रकाशित करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 28, 2025
अकोला: हल्ल्यात जखमी रोहिण पैठणकर यांच्या भेटीसाठी अशोक सोनोने जिल्हा रुग्णालयात, मदतीचे आश्वासन

अकोला: हल्ल्यात जखमी रोहिण पैठणकर यांच्या भेटीसाठी अशोक सोनोने जिल्हा रुग्णालयात, मदतीचे आश्वासन

July 28, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home