फारुक अहमद : वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठाम उभे रहा
नांदेड : महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. त्यांना मुस्लिमांची केवळ मतं हवी आहेत पण मुस्लिमांना प्रतिनिधीत्वाचा हक्क द्यायचा नाही. वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्याने 4 मुस्लिम उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आमचं आवाहन आहे की, त्यांनी आपले संविधानिक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठाम पणे उभे रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने 4 मुस्लीम उमेदवार दिले आहेत. मुस्लिम समाजाचे प्रश्न हे संसदेत सुटतील या हेतूने त्यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्याचे दिसते. महाविकास आघाडी किंवा अन्य प्रस्थापित पक्षांनी मुस्लिम समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही याकडे फारुक अहमद यांनी लक्ष वेधत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.