Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 16, 2024
in Uncategorized
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र
       

अतूट निष्ठा आणि प्रचंड मेहनतीचे कौतुक करत मानले कार्यकर्त्यांचे आभार

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटरवर कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

ॲड. आंबेडकर यांनी पत्रात काय म्हटले ?

• वंचित बहुजन आघाडीच्या प्रिय कार्यकर्त्यांनो, तुमच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा आणि पक्षासाठी तुम्ही केलेल्या अखंडीत कामाबद्दल आभार मानण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. •

येत्या शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर येथील मतदार मतदान करून आपापले प्रतिनिधी निवडतील. या मतदारसंघातील निवडणूक लढती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे.

• आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे.

• शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे आणि महाराष्ट्रातील जागा वाटपावरून मित्रपक्षांशी संघर्ष करत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उघडपणे बंड करत आहेत. महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने लढण्यास सक्षम आहे. यामुळेच काँग्रेसलाही मतदारांमधील आमची लोकप्रियता कळते आणि म्हणून आम्हाला त्यांच्या दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या हायकमांडने नागपुरातील त्यांच्या उमेदवारासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली.

• आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला एक संधी दिली आहे, ती म्हणजे राज्यस्तरीय पक्ष बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्याची.  हे केवळ आपले स्वप्न नाही; तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते; ते भैय्यासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मला माहित आहे की, तुम्ही सर्वजण हे 70 वर्षांचे अपूर्ण स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत.

• माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे की, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या पगारावर काम करणाऱ्या फेक न्यूज यंत्रणांनी पेरलेल्या खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका. त्याचा सत्याने सामना करा आणि तुमचा संयम गमावू नका. खरे तर त्यांना आपल्या पक्षाची आणि वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटते या गोष्टीचा तुम्हाला आनंद आणि गर्व वाटला पाहिजे. आपण पराक्रमी नसतो, तर त्यांनी लुटलेला पैसा आणि वेळ आमच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यात खर्च केला असता का? नाही!

•खोट्या बातम्या देऊन आपल्याला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण किती सामर्थ्यवान झालो आहोत हे दर्शवते. वंचित बहुजन आघाडी त्यांची दुकाने बंद करेल याला ते घाबरत असल्याचे वास्तव आहे.

• मीडिया आपल्यावर कुठल्याही प्रकारचे अफलातून आरोप लावेल. पण, तुमचा संयम गमावू नका. हे तेच माध्यम आहे जे मला हेलिकॉप्टरमधून प्रवास करतांना पाहिले तरी त्यांची झोप उडते पण, महायुती आणि महाविकास आघाडीकडे असणाऱ्या आणि येणाऱ्या पैशांच्या स्रोतांवर प्रश्न विचारणार नाहीत.

• हा तोच मीडिया आहे जो, एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी का दिली नाही?, असा प्रश्न या पक्षांना ते विचारणार नाहीत.

• हा तोच मीडिया आहे जो, या पक्षांनी किती ओबीसी उमेदवारांना उमेदवारी दिली?, असा प्रश्न ते विचारणार नाहीत. •

हा तोच मीडिया आहे जो, या पक्षांनी ओपन जागांवरून किती अनुसूचित जाती-जमातींना उमेदवारी दिली आहे?, असा प्रश्न ते विचारणार नाहीत.

• हा तोच मीडिया आहे जो, मला आणि आपल्या पक्षाला संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी या पक्षांनी इतक्या वर्षात कशा पद्धतीने एकत्र येवून मिलीभगत कशी केली?,  असा प्रश्न ते विचारणार नाहीत.

• हा तोच मीडिया आहे जो, अकोल्यात काँग्रेसने आरएसएसच्या स्वयंसेवकाला उमेदवारी का दिली?, असा प्रश्न ते विचारणार नाहीत.

• माध्यमांचा आपल्यासोबत भेदभाव नवीन नाही.  जेव्हा तुम्ही त्यांचे भेदभावपूर्ण विश्लेषण पाहता किंवा वाचता तेव्हा तुमचा संयम गमावू नका. त्यांना उत्तर देण्यासाठी संघटनेची शक्ती, सोशल मीडिया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मताचा वापर करा.

• अजून एक शेवटची विनंती आहे की, तुम्ही प्रचारासाठी बाहेर पडाल तेव्हा पुरेशी काळजी घ्या. पाण्याची बाटली आणि सोबत दुपट्टा ठेवा. तुम्ही पक्षाचा सर्वांत महत्त्वपूर्ण भाग आहात. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. ही लढाई आपण जिंकणारच !


       
Tags: bjpCongressMaharashtraNCPPrakash AmbedkarShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

भाजपने हिंदू विरोधात काम केले – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

बार्शीतील मांडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post
बार्शीतील मांडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बार्शीतील मांडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशात बेकायदा उपवर्गीकरण? वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप
बातमी

पुण्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशात बेकायदा उपवर्गीकरण? वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप

by mosami kewat
August 17, 2025
0

पुणे : समाज कल्याण विभागाच्या पुणे येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रियेवर वंचित बहुजन युवा आघाडीने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरेगाव...

Read moreDetails
Solapur : चांदणी नदीला पूर, वाहतूक ठप्प; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची धडपड

Solapur : चांदणी नदीला पूर, वाहतूक ठप्प; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची धडपड

August 17, 2025
वंचित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुका लढवणार; धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

वंचित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुका लढवणार; धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

August 17, 2025
सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

August 17, 2025
अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

August 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home