Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 10, 2024
in राजकीय
0
राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा  दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित
       
ॲड. प्रकाश आंबेडकर : मुंबईचे उमेदवार उद्या जाहीर करणार

अकोला : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

तसेच, मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ते म्हणजे लुंगी हटाव, पुंगी बजाव. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छ्ट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारल्याची आठवणही आंबेडकर यांनी करुन दिली.

सांगलीचे राजकारण तापलेले असताना आंबेडकर म्हणाले की, सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हतं, पण शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली. लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील, अशी अपेक्षाही आंबेडकरांनी व्यक्त केली.

मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. त्याचे कारण की, निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील. ते झालं की, मुंबईमधील पूर्ण गणित बदलते त्यासाठी आम्ही थांबलो होतो. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

माझ्या आणि वंचितच्या नादाला लागू नका

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तेवढा हुंडा मिळत नसल्याने ते महाविकास आघाडीत आले नाहीत असे विधान केले होते. यावर उत्तर देताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता. आपण बघू शकतो की, कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये. आम्ही काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरायला कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत.

Tags: AkolamahavikasaghadiParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सांगलीच्या विशाल पाटलांचे बंधू आंबेडकरांच्या भेटीला

Next Post

स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भाजपचा पराभव करा

Next Post
स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भाजपचा पराभव करा

स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भाजपचा पराभव करा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पैठण येथे ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात
बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पैठण येथे ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात

by mosami kewat
December 7, 2025
0

पैठण : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य अभिवादन...

Read moreDetails
‘धडक २’साठी मिळालेला पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय’; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची भावनिक पोस्ट चर्चेत!

‘धडक २’साठी मिळालेला पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय’; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची भावनिक पोस्ट चर्चेत!

December 6, 2025
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्टीच्या बुक स्टॉलवर भीम अनुयायांची ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्टीच्या बुक स्टॉलवर भीम अनुयायांची ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी

December 6, 2025
चैत्यभूमीवर ‘DAMA’ च्या मोफत वैद्यकीय शिबिरास ॲड. प्रकाश आंबेडकर-अंजलीताई आंबेडकरांची स्टॉलला भेट!

चैत्यभूमीवर ‘DAMA’ च्या मोफत वैद्यकीय शिबिरास ॲड. प्रकाश आंबेडकर-अंजलीताई आंबेडकरांची स्टॉलला भेट!

December 6, 2025
अनुयायांच्या सोयीसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर मैदानात; सोयी-सुविधांचा घेतला आढावा

अनुयायांच्या सोयीसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर मैदानात; सोयी-सुविधांचा घेतला आढावा

December 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home