ळगाव : फुले आंबेडकर विद्वत सभेचे मुख्य मार्गदर्शक भास्कर भोजने यांनी विभागीय समन्वयकांची एक दिवशीय बैठकीचे आयोजन व्हावे अशा प्रकारची सूचना या ग्रुपवर आठ दिवसांपूर्वी केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून राज्य समन्वयक प्रा.डॉक्टर विनोद उपर्वट यांच्या नेतृत्वाखाली प्रा. डॉक्टर सत्यजित साळवे यांनी “रिच पॅलेस” जळगाव येथे बैठकीचे आयोजन केले. ही बैठक फुले आंबेडकर विद्वत सभेचे मुख्य मार्गदर्शक भास्कर भोजने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व विभागीय समन्वयकांनी आपापल्या क्षेत्रात करीत ससलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली आणि विद्वत सभेच्या कार्याची गती धीमी असली तरी ती सकारात्मक कार्यशील आहे असे मत सर्वांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात विशेषतः कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व खानदेश विभागात फुले आंबेडकर सभेचे कार्य गतिशील नाही याचीही खंत व्यक्त करण्यात आली. तरीही राज्य समन्वयक प्रा. डॉक्टर मनोज निकाळजे सकारात्मकतेने या उर्वरित विभागात कार्य होईल असे मत नोंदविले.
बाळासाहेब आंबेडकरांनी राजकीय स्तरावर सुचविलेल्या 39 मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा होऊन फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने विस्तारित पुस्तिका आठ ते बारा दिवसांमध्ये काढावी असेही ठरले. त्याकरिता ज्या ज्या समन्वयकांना शक्य असेल त्यांनी अभिप्रेत मुद्द्यांवर दोन ते तीन पानाचे विस्तृत लेखन करून ते राज्य समन्वयक प्रा. डॉक्टर मनोज निकाळजे सरांकडे द्यावे असेही ठरविण्यात आले.
प्रा. डॉ.सत्यजित साळवे (खानदेश) आणि प्रा. डॉक्टर पूनम एसांबरे (पूर्व विदर्भ) यांना विभागीय समन्वयक म्हणून उपस्थितांच्या संमतीने सन्माननीय भास्कर भोजने यांनी नियुक्त केले.या यावेळी दोन्हीही नवनिर्वाचित विभागीय समन्वयकांनी आम्ही विद्वत सभेच्या वाढीस अत्यंत कार्यक्षमतेने कार्य करीत आणि उपस्थित त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वासास पात्र ठरू व बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताईंचे नेतृत्व मान्य करून कार्य करू असे उपस्थितांचे आभार मानून स्पष्ट केले.
महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीत फुले आंबेडकर विद्वत सभेच्या सर्वच विद्वतांनी गतिशील व वैचारिकतेने कार्य करावे असेही ठरावाद्वारे सूचित केले. त्याकरिता समन्वयकांनी आपापल्या क्षेत्रात कमीत कमी दहा व त्यापेक्षा जास्त समन्वयक तयार करावेत जेणेकरून वंचित बहुजन आघाडीला पूरक कार्य करणारे कार्यकर्ते मिळू शकतील असा आशावाद व्यक्त केला, तसेच विभागीय समन्वयकांनी आपापल्या क्षेत्रात दोन ते तीन प्रशिक्षण वर्ग घेऊन समन्वयकांना अधिक कार्यरत करावे असेही ठरविण्यात आले.
या चिंतन बैठकीस विभागीय समन्वयक प्राचार्य डॉक्टर विठ्ठल खाडे,(वाशिम) प्रा. डॉक्टर रमेश इंगोले (बुलढाण प्रा. डॉक्टर केशव मेंढे (नागपूर) प्रा. डॉक्टर जगदीश जाधव (रत्नागिरी) प्रा. डॉक्टर माधव पुणेकर (पुणे) सन्माननीय सिद्धार्थ देवदरीकर (अकोला) प्रा.डॉक्टर पूनम एसांबरे (वर्धा) आयोजक प्रा.डॉक्टर सत्यजित साळवे (जळगाव) राज्य समन्वयक प्रा. डॉक्टर विनोद उपर्वट, राज्य समन्वयक प्रा. डॉक्टर मनोज निकाळजे, मुख्य मार्गदर्शक भास्कर भोजने आणि बैठकीस विशेष सहकार्य करणारे प्रा. डॉक्टर प्रमोद भुंबे व प्रा. डॉक्टर सरदार (द्वय जळगाव) आयु. भाऊराव सोनोने (अकोला) उपस्थित होते.