Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद शहरात मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 8, 2024
in बातमी
0
औरंगाबाद  शहरात मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी.
       

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाने व प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.अरुंधती ताई शिरसाठ यांच्या आदेशाने वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे शहरामधे प्रत्येक वॉर्ड मध्ये ठीक ठिकाणी माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामधे प्रामुख्याने महिलांचा समावेश होता.

वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदना जाधव यांच्या मार्गदर्शनाने महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संघटनेने आपापल्या वॉर्ड मध्ये रमाई जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षाच्या वतीने आव्हान करण्यात आले की राज्य सरकारने रमाई जयंती निमित्त सुट्टी जाहीर करून , यापुढे प्रत्येक शाळेमध्ये रमाई जयंती साजरी करण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने काढावे असे आवाहन शहर अध्यक्षा वंदना जाधव यांनी केले.

कुतुबपूरा येथे शहर आघाडीच्या प्रवक्ता संगीता अंभोरे यांनी त्याग मूर्ती रमाई यांच्या बद्दल मोलाचे मार्गदर्शन करून महिला व लहान मुलींच्या स्पर्धा घेत महिलांना आणि मुलींना शितल बनकर, मृणाल शिंदे, मंगल देहरे, सोनवणे आणि कुतुबपुरा महिला मंडळ यांनी प्रोत्साहित केले.

विश्रांती नगर, भरत नगर येथे किशोर निकाळजे ,रामदास वाघमारे, तसेच सोनावणे आणि सुलोचना साबळे यांनी रमाई जयंती निमित्त फळ वाटप करून, भोजन दान ठेवले. महाडा कॉलनी हर्सूल येथे मीना ताई जाधव तसेच वंदना जाधव यांच्या वतीने बौद्ध विहार सुभेदारी रामजी नगर,तसेच पैठण गेट येथे सुनीता कोतकर यांच्या वतीने रमाई जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.


       
Tags: AkolaramaiambedkarVanchit Bahujan AaghadiVanchit bahujan mahila aaghadi
Previous Post

‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त सभासद होण्याचे आवाहन !

Next Post

महिलांनी राजकारणात सक्रीय झालं पाहिजे – रेखाताई ठाकूर

Next Post
वंचित आघाडी महाविकास आघाडीत जाहीर करणे ही निव्वळ धूळफेक आहे – रेखा ठाकूर

महिलांनी राजकारणात सक्रीय झालं पाहिजे - रेखाताई ठाकूर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

by mosami kewat
June 12, 2026
0

मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'विद्यार्थी आक्रोश मोर्चा' दरम्यान मोठा तणाव...

Read moreDetails
' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

June 12, 2026
अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

June 12, 2026
मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

June 12, 2026
बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

June 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home