अकोला :अकोला, भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने आज पासून भव्य धम्म जनजागृती रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आद. अंजलीताई आंबेडकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
याप्रसंगी बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा भिक्षू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भंते बी.संघपालजी महाथेरो, उपाध्यक्ष पूज्य भंन्ते बुद्धपालजी महाथेरो तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखेडे,महासचिव नंदकुमारजी डोंगरे, वंचित चे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे,जि.प.सदस्य राम गव्हाणकर, माजी जि. प. अध्यक्षा पुष्पाताई इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी तसेच धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि एक आदर्श समाज निर्माण व्हावा यासाठी या धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ही धम्म रॅली पूर्ण जिल्ह्यामधून जाणार आहे. या धम्म रॅली सोबत भन्ते बुद्धपालजी महाथेरो त्यांचा संघ आणि इतर भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होतील.
या उदघाटन प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे प्रचार प्रसार पर्यटन प्रमुख तथा बौध्दाचार्य आयु. राहुलजी अहिरे, सचिव राहुल गोटे, संस्कार विभाग प्रमुख आयु. डि. एस. ननीर सर,संघटक रमेश गवई गुरुजी,जिल्ह्याचे महिला अध्यक्षा आद. ईंदूताई मेश्राम, आयु. सदाशिव मेश्राम, आयु. मेजर दंदी,माजी अध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी, राजेश दारोकार, आयु. सुनंदाताई तेलगोटे,जेष्ठ केन्द्रीय शिक्षिका आयु.आशाताई अहिरे,आयु.करुणाताई साखरकर, आयु. वैशाली ताई गोटे, आयु. प्रतिभाताई वानखडे आयु शोभाताई आठवले ,वर्षाताई डोंगरे, आयु. कांताबाई थोरात ,आयु.डी.बी.शेगावकर, महानगराचे अध्यक्ष आयु. विश्वास बोराळे, सरचिटणीस आयु.प्रकाश बागडे,भाऊसाहेब थोरात, ऍड.किरण पळसपगार, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे, महानगराचे, तालुक्याचे पदाधिकारी ,केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्ध उपासक ,उपासिका, बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.