Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

जो पक्ष लोकसभेत किमान 14 जागा ओबीसींना देईल तो आपला पक्ष.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 29, 2024
in राजकीय
0
जो पक्ष लोकसभेत किमान 14 जागा ओबीसींना देईल तो आपला पक्ष.
       

प्रकाश आंबेडकरांचा ओबीसींना दिला राजकीय मित्रपक्ष ओळखण्याचा सल्ला !

माढा : आपला राजकीय मित्र पक्ष ओळखायचा असेल, तर राखीव जागा सोडून उद्याच्या लोकसभेत ओबीसींना कोण जास्त उमेदवारी देत आहे ते महत्वाचं आहे. जो पक्ष लोकसभा निवडणुकीत ओबीसींना किमान 14 ठिकाणी उमेदवारी देईल तो आपला पक्ष असेल असा मंत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी माढा येथे झालेल्या ओबीसी परिषदेत ओबीसींना दिला आहे.

एक-दोन मंत्री राहून दोन चार खासदार निवडून दिले तर फारसा फरक पडत नाही त्यांचा आवाज कोणी ऐकत नाही. जोपर्यंत आपण मोठ्या संख्येने जात नाही तोपर्यंत निर्णय प्रक्रियेवरती आपला ताबा राहत नाही.

भाजप हा बेभरवशाचा पक्ष आहे. भाजपवर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. म्हणून, ज्या पक्षावर विश्वास ठेवता येत नाही. त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही. ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षण निर्णयावर भाष्य करताना ॲड. अबेडकारांनी म्हटले की, भाजप म्हणत होतं की, आम्ही ओबीसींच्या बाजूने आहोत. आम्ही त्यांचं नुकसान होऊ देणार नाही, असे ते म्हणत होते. पण, काल ते काहीच करू शकले नाहीत. एकनाथ शिंदे यांना जे करायचं होतं, ते त्यांनी केलं. देवेंद्र फडणवीस मात्र गप्प बसले.

संविधान बदलण्याच षडयंत्र भाजप करत आहे. कारण, संविधान केवळ शिक्षणातलं आरक्षण देत नाही, नोकऱ्यांमधील आरक्षण नाही, तर 6.50 कोटी जे महाराष्ट्राचे बजेट आहे त्यातील 27 टक्के हिस्सा ओबीसीला गेला पाहिजे. असेही आपले संविधान सांगते. भाजप करत असलेला धर्माचा कांगावा हा एक प्रकारचा डाव आहे. आरक्षणवादींच्या आरक्षणावरती यांना डल्ला मारायचा असल्याचे मत त्यांनी मांडले.

जो पक्ष आरक्षणवाद्यांना मातीत घालायला निघाला आहे. त्या पक्षाला आपण सत्तेतून दूर करणार आहोत की नाही ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटले की, यांना दूर करणार नसाल, तर तुम्ही मातीत जालं. तुमच्या नंतरच्या पिढ्या सुद्धा तुम्ही मातीत घालालं.

आंदोलनातून आणि सभेतून जागृती होते. पण, निर्णय हा विधानसभा आणि लोकसभेमधून घेतला जातो. विधानसभा आणि लोकसभेत आरक्षणवादी पोहचलाच नाही, तर त्यांच्या हिताचं कोण बोलणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.

उद्याच्या निवडणुकीत आपण आरक्षणवादीचं राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही म्हटलं पाहिजे की, माझं मत हे आरक्षणवाद्यालाचं असेल. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.


       
Tags: madhaMaharashtraobcPrakash AmbedkarreservationVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ मुंबईमधून लोकसभेच्या 2 जागा लढणार ?

Next Post

खोट्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांवर वंचित गुन्हा दाखल करणार !

Next Post
खोट्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांवर वंचित गुन्हा दाखल करणार !

खोट्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांवर वंचित गुन्हा दाखल करणार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !
article

अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !

by mosami kewat
December 13, 2025
0

- राहुल ससाणेपीएच. डी संशोधक विद्यार्थी व त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध आधीछात्रवृत्तीची उलट- सुलट चर्चा गेल्या चार पाच वर्षांपासून मोठ्या...

Read moreDetails
'GOAT इंडिया टूर'साठी आलेल्या मेस्सीमुळे कोलकातामध्ये नाराजी

‘GOAT इंडिया टूर’साठी आलेल्या मेस्सीमुळे कोलकातामध्ये नाराजी

December 13, 2025
सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

December 13, 2025
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोल्यात उत्साहात साजरी!

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोल्यात उत्साहात साजरी!

December 13, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकर : बुथवरील चोरी थांबवा; झोपडपट्टीला न्याय द्या!

ॲड. प्रकाश आंबेडकर : बुथवरील चोरी थांबवा; झोपडपट्टीला न्याय द्या!

December 13, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home