Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित युवा आघाडीचा दणका ; बार्टी प्रशासनाने भोजन ठेका केला रद्द!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 30, 2023
in बातमी
0
वंचित युवा आघाडीचा दणका ; बार्टी प्रशासनाने भोजन ठेका केला रद्द!
       

पुणे : वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्याचे महासचिव राजेंद्र  पातोडे  यांच्या नेतृत्वात आज बार्टीच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले. १ जानेवारी रोजी शौर्य दिना करिता भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील ६० लाख रुपये खर्च करून फक्त ५० हजार लोकांना जेवण पुरविण्याचा भोजन ठेका रद्द करण्यात आला.

 तसेच पोलीस भरती निवासी प्रशिक्षणाला  या करिता तीन महिने मुदतवाढ तात्काळ देण्यात आली . एम. फिल ते पीएच.डी करण्याकरिता २०२१ सालच्या ४९विद्यार्थ्यांना पीएच.डी फेलोशिप करिता पात्र करण्यात आले. २०२२ च्या विद्यार्थ्यांना सरसकट ७६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप बार्टी प्रशासनाकडून मंजूर करून घेण्यात आल. आर्थिक बजेट करीता सकारात्मक प्रस्ताव देखील बार्टीच्या वतीने शासनास पाठविण्यात आला आहे.

बार्टी प्रशासनाला त्यांच्या कार्याची जाणीव करून देण्यात आली तसेच बार्टीचे नेमके उद्देश काय हे त्यांना समजून सांगण्यात आले बार्टीचे उद्देश लिहिलेला एक फलक वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बार्टी प्रशासनालाच भेट देण्यात आला.

 बार्टी ही स्वायत्त शिक्षण संस्था असून संशोधक विद्यार्थी घडवण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे परंतु बार्टी मधील अधिकारी या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक करताना आमच्या निदर्शनास आले होते आणि म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये आज कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक पवित्र घेऊन सगळे प्रश्न आज निकाली काढण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले.

तसेच इथून पुढच्या काळात देखील ज्या ज्या वेळी विद्यार्थ्यांवर अन्याय होईल त्या त्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि हा लढा आता सुरू झालेला असून या लढ्यामध्ये अनेक टप्पे अजून बाकी आहेत. असे वंचित बहुजन युवा आघाडीने म्हटले आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लघुपट महोत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ६ वा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२३आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमास अभिनेत्री गार्गी कुलकर्णी या उद्घाटक म्हणून असणार आहेत त्यांना तब्बल ८ लाख रुपये मानधन या कार्यक्रमासाठी देण्यात येणार होतं वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ते मानधन तात्काळ थांबविण्यात यावं अशी मागणी करण्यात आली.

तसेच इथून पुढच्या काळामध्ये अनुसूचित जाती जमातीतील तरुणांना, तरुणींना, कलावंतांना वाव देण्याचे काम बार्टीच्या करण्यात येईल असे महासंचालक सुनिल वारे यांनी सांगितले.

तसेच चांगले कलावंत घडविण्याकरिता बार्टीच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणारे कार्यक्रम हाती घेण्याचा सुद्धा त्यांनी निर्धार केला.

 यावेळी राज्य कार्यकारी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरेपाटील ,राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल गवळी,राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड.अफरोज मुल्ला , तसेच वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी ,वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन  पुणे शहर ,पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड सर्व अध्यक्ष तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: BARTIPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

काँग्रेसच्या पोटातलं ओठात आलयं काय ? वंचित ने थेटचं विचारलं !

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडीचे यश; सरसकट ७६१ विद्यार्थ्यांना मिळणार बार्टीची फेलोशीप !

Next Post
वंचित बहुजन युवा आघाडीचे यश; सरसकट ७६१ विद्यार्थ्यांना मिळणार बार्टीची फेलोशीप !

वंचित बहुजन युवा आघाडीचे यश; सरसकट ७६१ विद्यार्थ्यांना मिळणार बार्टीची फेलोशीप !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोदी "द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!" ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
बातमी

मोदी “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

by mosami kewat
September 16, 2025
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. सोशल मीडियावर...

Read moreDetails
बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

September 16, 2025
पुण्यात फेलोशिप जाहिरातीबाबत विद्यार्थ्यांचे निषेध आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

पुण्यात फेलोशिप जाहिरातीबाबत विद्यार्थ्यांचे निषेध आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

September 16, 2025
वंचित बहुजन आघाडीचे गोविंद सुर्वे यांचे निधन; सुजात आंबेडकर यांची कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

वंचित बहुजन आघाडीचे गोविंद सुर्वे यांचे निधन; सुजात आंबेडकर यांची कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

September 16, 2025
Nanded : पुरग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी फारुख अहमद यांचे आमरण उपोषण!

Nanded : पुरग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी फारुख अहमद यांचे आमरण उपोषण!

September 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home