पुणे : वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँगेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी निजामी मराठ्यांकडून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस सोबतच्या जागा वाटपाच्या खोट्या बातम्या माध्यमातून पसरवल्या जात असल्याची गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी केली आहे.
ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी म्हटले आहे की, काँग्रेसमधील काही नेत्यांना निजामी मराठा लोकसभेच्या जागावाटपाच्या अफवा पसरवल्याचे आरोप करत टीका केली. ते म्हणाले की, शिवसेनेबरोबर आमची युती आहेच, पण जागा वाटपाबद्दल चर्चा पुढे सरकलेली नाही. त्याचे कारण शिवसेनेलाच अजून त्यांनी 2019 मध्ये लढविलेल्या जागां व्यतिरिक्त किती जागा मिळणार आहेत? ह्याची स्पष्टता त्यांना महाविकास आघाडीकडून मिळालेली नाही. शिवसेनेला किती अधिक जागा मिळतील याची स्पष्टता आल्याशिवाय चर्चेतून काही निष्पन्न होणार नाही.
वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्याबद्दल आणि काही जागांबाबत चर्चा चालू असल्याच्या बातम्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. त्याला काही आधार नसून त्या खोट्या बातम्या काँग्रेसमधील निझामी मराठ्यांकडून पसरिविल्या जात आहेत, असे ॲड. तेलंग यांनी म्हटले आहे.
एका महिन्याच्या कालावधीत अकोला, शिवाजी पार्क, मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागात झालेल्या प्रचंड सभांनातर काँग्रेसमधील निझामी मराठ्यांनी वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेस बरोबरच्या युतीची शक्यता अडचणीत आणण्यासाठी ह्या अफवा पसरवायला सुरवात केली आहे. ही खेळी काँग्रेसमधील काही नेत्यांनी या पूर्वीही केली आहे. काँगेसबरोबर जागा वाटपाबाबत काहीही चर्चा झालेली नाही हे आम्ही स्पष्ट करत आहोत. ह्या अफवांबद्दलाचा खुलासा श्री मल्लिकार्जुन खरगे आणि श्री राहुल गांधी यांनी त्वरित करावा. असे म्हणत याबाबत खुलासा करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
काँगेसकडून असा काही प्रस्ताव असेल तर आम्ही मोकळ्या मनाने स्वागतच करू पण, अद्याप असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. ह्या अफवांमध्ये किंवा प्रस्तावामध्ये काही तथ्य असेल तर आम्ही प्रथम महाराष्ट्राच्या जनतेला अधिकृतरित्या सांगू. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.