Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जि. प. समाजकल्याण योजनेतुन अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी मिळाली जागा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 3, 2022
in बातमी
0
जि. प. समाजकल्याण योजनेतुन अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी मिळाली जागा
       
मातंग समाज बांधवांकडुन अॅड. बाळासाहेब आंबेडकरांचे स्वागत

अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या योजनेमधुन तेल्हारा तालुक्यातील अकोली रुपराव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी दोन गुंठे जागा देण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.‌ बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करण्यासाठी मातंग समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी भेट घेतली.

तेल्हारा तालुक्यातील अकोली रूपराव येथे अनेक वर्षापासून मातंग समाजाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहासाठी असलेला भूखंड येथील स्थानिक राजकारणाच्या दबावामुळे प्रलंबित होता. या समाज मंदिराच्या जागेसाठी मातंग समाज बांधव संघर्ष करत होते. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तथा मातंग समाज नेते गजानन तायडे यांनी पुढाकार घेऊन वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अॅड. संतोष राहाटे, बालमुकुंद भिरड, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्यासोबत सदर बाबीसंदर्भात चर्चा केली असता मातंग समाज बांधवांचा असलेला संघर्षाचा विचार करुन अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभापतींना रखडलेली दोन गुंठे जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहासाठी देण्याचे आदेश दिले. यासाठी गुरुवारी अकोली रुपराव येथील मातंग समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी मातंग समाजाचे युवा अध्यक्ष सागर तायडे, मोहन अंजनकर, विनायक तायडे, कृष्णा तायडे, ओम तायडे, युवराज तायडे, आकाश तायडे, वेदांत तायडे, गोपाल नावकर, संतोष खंडारे यांच्यासह उपसरपंच लक्ष्‍मण सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सागर लासुकर, त्र्यंबक तायडे, मातंग समाज नेते गजानन तायडे, गजानन दांडगे, संजय बोदळे, प्रभाकर बोरकर, मोहन अंजनकर, गंगाधर सावळे, मातंग समाजाच्या नेत्या मयुरी मोरे, गोपाल अंजनकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

Tags: AkolaAnnabhau SatheMatangPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

“फुले आंबेडकरी विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया”; जेष्ठ विचारवंत डॉ. संजय मुन यांचे प्रतिपादन

Next Post

आर्थिक आधारावर आरक्षण हे कॉंग्रेस भाजपचे संयुक्त पाप – राजेंद्र पातोडे.

Next Post
सर्वोच्च न्यायालय आणि समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे !

आर्थिक आधारावर आरक्षण हे कॉंग्रेस भाजपचे संयुक्त पाप – राजेंद्र पातोडे.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!
बातमी

२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

by mosami kewat
July 21, 2026
0

अहिल्यानगर: NEET परीक्षा प्रणालीतील महाघोटाळा आणि NTA च्या बेजबाबदार कारभारामुळे देशभरात तब्बल २२ निष्पाप विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं, तरीही या...

Read moreDetails
आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

July 21, 2026
SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 20, 2026
अखेर पीपल्स एज्युकेशन सोसायटीला न्याय मिळाला ; धर्मादाय आयुक्तांचा ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने निकाल 

अखेर पीपल्स एज्युकेशन सोसायटीला न्याय मिळाला ; धर्मादाय आयुक्तांचा ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने निकाल 

July 20, 2026
वंचित बहुजन आघाडीत लोकशाहीचा नवा अध्याय, ३० जुलैला पक्षांतर्गत निवडणुका; प्रदेशाध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

वंचित बहुजन आघाडीत लोकशाहीचा नवा अध्याय, ३० जुलैला पक्षांतर्गत निवडणुका; प्रदेशाध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

July 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home