Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष चळवळीचा दस्तऐवज

चळवळीचा दस्तऐवज-२३ वर्षांपूर्वीचा : लोकसभेत बाळासाहेब……

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 13, 2022
in चळवळीचा दस्तऐवज, विशेष
0
गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांचे राजीनामे घ्यावेत – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
       

प्रास्ताविक

मा. पंतप्रधान श्री. व्हि.पी. सिंग यांनी भारिपचे नेते एड. बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना १९९० ते ९६ या काळात राज्यसभेवर नियुक्त केले होते. १९९८ ला ते अकोला मतदार संघातून निवडून लोकसभेवर गेले होते. १९९९ ते २००४ या कालखंडात ते परत निवडून आले होते. या कालखंडातील बाळासाहेबांची (Prakash Ambedkar
) राज्यसभा व लोकसभेतील भाषणे, त्यांचा जागतिक संदर्भासह अभ्यास, चिंतन याची साक्ष आहे. पण, या सा-यांकडे ठरवून येथील राजकीय पक्ष, मीडिया, विचारवंत, अभ्यासक यांनी संपूर्णत: दुर्लक्ष केले आणि सतत खोट्या नाट्या वावड्या उठवून टीकाकारांचे नसलेले शहाणपण-परिपक्वता दाखवत राहिले. या संदर्भात प्रबुध्द भारत ने ही सर्व मूळ, ओघवत्या इंग्रजीतील भाषणे प्रथम पुस्तक रूपाने प्रसिध्द करायला हवीत. त्यानंतर त्याचे मराठीत भाषांतर करून मराठी पुस्तक काढायला हवे. अभ्यासू कार्यकर्ते, प्रामाणिक अभ्यासक, विचारवंत याचे निश्चितच स्वागत करतील यात शंका नाही……..शांताराम पंदेरे


उत्तर-पूर्वेकडील लोकांना आपल्याबरोबर घेतले नाही, तर अण्वस्त्रे काहीच उपयोगी ठरणार नाहीत.

खासदार बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar)

(दि. २९ मे १९९८ रोजी अणुचाचण्यांसंबंधी लोकसभेत चर्चा झाली. त्यावेळी खा. बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेत मुळ इंग्रजीतून केलेले भाषण संक्षिप्त अनुवाद रूपात प्रसिध्द करत आहोत.)

अध्यक्ष महोदय,

आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार. देशातील अण्वस्त्र बनविणा-या शास्त्रज्ञांचे मी प्रथम अभिनंदन करतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

भारताने अणुस्फोट घडवून आणला हे कृत्य बरे की वाईट होते; यावर आता बोलण्यात अर्थ नाही. कारण ती घटना आता इतिहास झाली आहे. परंतु, आता देशाने एका आवाजात बोलणे गरजेचे आहे.

२१ व्या शतकात आपण पदार्पण करत आहोत म्हणून स्फोट केला. अणुस्फोटाबाबत या दिलेल्या कारणाशी मी सहमत नाही. तसेच चीन हा आपला एक नंबरचा शत्रू आहे ,असे म्हणून आम्ही मोठी गफलत करीत आहोत. कारण चीन हा काही आपला उघड शत्रू नाही. तर चीन पाकिस्तानला मदत करून प्रोव्होक (उचकावण्याचा) करण्याचा प्रयत्न करीत होता ही बाब चीनशी चर्चेद्वारे आपल्याला सांगता आली असती. मला महत्त्वाचे वाटते ते म्हणजे पाकचे दुटप्पी धोरण. पाक डबल रोल खेळतो आहे. तो एका बाजूला अण्वस्त्रासाठी तंत्रज्ञानाची मदत चीनकडून घेत आहे. तर दुस-या बाजूला आखाती देशांना जी अण्वस्त्रांची गरज आहे ती तो इस्लामी बॉंब देऊन त्यांना हा बॉंब सेल करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातून जागतिक पातळीवर तो खाडी युध्दावरून पाश्चिमात्य जग व इस्लामिक जग असे भांडण पुन्हा उभे करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. हा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेने पाकवर निर्बंध घातल्यामुळे त्याची काही कुचंबणा न होता त्याचा परिणाम म्हणून इस्लामिक जग पाकला सर्व प्रकारचे आर्थिक व तंत्रज्ञानाचे सहाय्य करणार आहे. पाकिस्तानला हे अभिप्रेत होते. तेच अणुचाचण्या व अमेरिकेकडून होणा-या निर्बंधातून घडून येणार आहे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, असे मला वाटते.

By nuclear explosions we have created a tiger. Whether the tiger has teeth or not, will be demonstrated within a year.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अण्वस्त्रबंदीचे जागतिक पातळीवर करार- सिटिबिटी व एनपिटी अण्वस्त्र प्रसार बंदी करार यासारखे करार आता एका अर्थाने कुचकामी होणार आहेत. कारण आता अनेक देश न्युक्लिअर डिव्हाईस टेस्टिंग (अणुचाचण्या घ्यायला) सुरुवात करतील. त्यात इस्त्राईल सर्वात प्रमुख देश असणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अणुस्फोटानंतरची भावी राजकीय परिस्थिती विचारात घेऊन आपली रणनीती तयार केलेली आहे का? तशी रणनीती तयार केलेली असेल ,तर ती या सभागृहाला सांगावी.

चीन सोबत शत्रुत्व नको!

पंतप्रधानांनी अमेरिकेचे अध्यक्ष क्लिंटन यांना पत्र लिहून चीन आमचा नंबर एकचा शत्रू असल्याचे कळविले आहे. त्यामुळे चीनशी सुधारणारे आमचे संबंध सुधारणार तर नाहीच उलट ते जास्त बिघडण्याची शक्यता निर्माण केली गेली आहे.

अणुस्फोट : दक्षिण आशियात शीतयुध्दाला सुरुवात

११ मे १९९८ रोजी राजस्थानातील पोखरण या वाळवंटी भागात भारत सरकारने तीन अणुस्फोट घडवून आणले. त्यानंतर १३ मे रोजी पुन: दोन अणुस्फोट केले.

अणुस्फोटाचा निषेध म्हणून अमेरिका, जर्मनी आणि जपान, या देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले.

२८ मे रोजी पाकिस्ताननेही पाच अणुस्फोट घडवून आणले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री गोहर अयुबखान यांनी भारतास प्रत्युत्तर म्हणून आम्ही ह्या अणुचाचण्या घेतल्या असे घोषित केले. ३१ मे रोजी पाकिस्तानने पुन: एक अणुस्फोट घडवून आणला.

भारत आणि पाकिस्तानच्या या अणुस्फोटांनी दक्षिण आशिया खंडात शीयुध्दाला सुरुवात झाली आहे.

सध्याच्या परिस्थितीत उत्तरपूर्व राज्यात बंडखोरी सुरू आहे. पावसाळ्याच्या काळात या प्रदेशात जो पेट्रोलियम पदार्थांचा साठा केला जातो तो या बंडखोरीमुळे अद्याप केला गेलेला नाही. एकदा पावसाळा सुरू झाला की ,या भागातील दळण वळण थांबते. याचा फायदा शेजारची राष्ट्रे घेऊ शकतात. अशा परिस्थितीत पोलिटीकल स्टेट्समनची गरज आहे. पन्नास वर्षांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या उत्तरपूर्वेच्या प्रदेशातील माणसांना आपण आपल्याबरोबर जुळवून घेऊ शकलो नाही. आपणच तळें निर्माण केले. त्यात अनेकजण पोहोण्याचा विचार करतील. अशा परिस्थितीत अणुशक्तीची हत्यारे काहीच उपयोगात येणार नाहीत.

युध्दाचे साहस करू नका

अणुशक्तीच्या स्फोटाने आपण जो एक वाघ निर्माण केला आहे. त्याला दात आहेत की नाहीत हे येत्या वर्षभरात कळेल. वर्षभरात त्याल दात नसेल, तर परिस्थिती अधिकच बिकट होईल.

माझी माहिती आहे की, तुम्ही युध्द करण्याच्या तयारीत आहात. जे एक मोठे साहस Adventure (एडव्हेंचर) होईल आणि या साहसामधून काहीही साध्य होणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. असे जर काही विचार असतील ,तर त्यापासून आपण परावृत्त व्हाल हीच इच्छा व्यक्त करून माझे भाषण संपवितो.

धन्यवाद!

(संदर्भ : लोकसभेत बाळासाहेब, प्रबुध्द भारत, मे-१९९८, संपा-खास. बाळासाहेब आंबेडकर, पान ५-६)


       
Tags: Prakash Ambedkar
Previous Post

बसपा ठाणे जिल्हा महासचिवांसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते वंचित मध्ये सामील.

Next Post

“जोवर हिंदू-मुस्लीम वाद पेटत नाही तोवर…”; टिपू सुलतान प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर गंभीर आरोप

Next Post
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई

“जोवर हिंदू-मुस्लीम वाद पेटत नाही तोवर…”; टिपू सुलतान प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर गंभीर आरोप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नारेगाव येथे कब्रस्तानच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे बेमुदत आमरण उपोषण
बातमी

नारेगाव येथे कब्रस्तानच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे बेमुदत आमरण उपोषण

by mosami kewat
December 14, 2025
0

औरंगाबाद : नारेगाव येथील मुस्लिम समाजासाठी दफनभूमी (कब्रस्तान) उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीचे नाशिक शहरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

वंचित बहुजन आघाडीचे नाशिक शहरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

December 14, 2025
पुण्यातील राजकीय चित्र बदलणार;  भाजपविरोधात जनतेचा जनआक्रोश ठरणार – वंचित बहुजन आघाडी

पुण्यातील राजकीय चित्र बदलणार;  भाजपविरोधात जनतेचा जनआक्रोश ठरणार – वंचित बहुजन आघाडी

December 14, 2025
नांदेड : भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने मुदखेड येथे प्रशिक्षण पूर्व बैठक संपन्न

नांदेड : भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने मुदखेड येथे प्रशिक्षण पूर्व बैठक संपन्न

December 14, 2025
महाराष्ट्रात ‘आधुनिक वेठबिगारास’ कायदेशीर मान्यता हा नवा मनुवाद – राजेंद्र पातोडे.

अजित पवारांनी जीभेचा उपचार करून घेतला पाहिजे, ते मालक नाही जनसेवक आहेत…

December 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home