Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“जोवर हिंदू-मुस्लीम वाद पेटत नाही तोवर…”; टिपू सुलतान प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर गंभीर आरोप

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 13, 2022
in बातमी
0
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई
0
SHARES
389
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

मुंबई – मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन मालाडमध्ये भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या सगळ्या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हा हिंदू – मुस्लीम वाद पेटवण्यासाठीचा मुद्दा असल्याचं सांगत डॉ. प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) म्हणाले, “टिपू सुलतान हा फार महत्वाचा मुद्दा आहे अस मी मानत नाही. आर.एस.एस आणि भाजपाला अँटी मुस्लीम लाट निर्माण करणं हे जिंकण्याचं साधन आहे असं ते मानतात. हळूहळू आपला जनाधार कमी होतोय का या भीतीपोटी त्यांनी आता अँटी मुस्लीम भूमिका घ्यायची सुरूवात केली आहे. मुंबईतही त्यांनी टीपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद उपस्थित केला आहे. दंगल होईल अशी परिस्थिती आहे. जोवर हिंदू मुस्लीम वाद पेटत नाही, तोवर शासन आपल्या हातात येईल असं त्यांना वाटत नाही. म्हणून उद्याच्या कालावधीत ही परिस्थिती बदलेल असं मला वाटतं”.

काय आहे प्रकरण?

मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या वादाने राजकीय वातावरण तापले आहे. क्रीडा संकुलाच्या उद्धाटनाआधी भाजपा, बजरंग दलाने नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकर आंदोलनासाठी उपस्थित होते. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन केले आहे. यावरून आता भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रभर यासंदर्भात आंदोलनचे लोण पसरण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.

वृत्तसंस्था


       
Tags: Prakash Ambedkar
Previous Post

चळवळीचा दस्तऐवज-२३ वर्षांपूर्वीचा : लोकसभेत बाळासाहेब……

Next Post

LGBTIQA+ चळवळ आणी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्माचा विचार

Next Post
Photo by Ylanite Koppens from Pexels

LGBTIQA+ चळवळ आणी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्माचा विचार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क