Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी कडून भेदभावविरोधी धोरणात ‘जाती’चा समावेष

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 22, 2022
in बातमी
0
कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी कडून भेदभावविरोधी धोरणात ‘जाती’चा समावेष
       

कॅलिफोर्निया : जात ही एक दिवस जागतिक समस्या होईल असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. भारताचा “जातीय” समाज जसजसा जगभरात पसरेल, तसा तो जातीची समस्या सगळीकडे पसरवेल असे त्यांचे म्हणणे होते. भारतातून विदेशात सथाईक झालेल्या लोकांनी भारतातली जातही विदेशात नेली. त्याबरोबर जातीय वर्चस्वाची भावना आणी जाती आधारित भेदभावाची संस्कृती ही नेली. याचाच परिणाम म्हणून आता विविध देशातल्या शासन-प्रशासनाला या समस्येविरोधात उपाययोजना कराव्या लागत आहेत.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी सिस्टिम मध्ये आता भेदभावविरोधी धोरणात जातीचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याची भावना आहे. भारतासह दक्षिण आशियातील देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर जातीय भेदभावला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आल्याने हे पाऊल उचलले गेले.

Equality Labs या नॉन प्रॉफिट संस्थेने २०१६ साली एक सर्वेक्षण केले. त्यात प्रत्येकी ३ पैकी १ दलित विद्यार्थ्याने जातीय भेदभावाचा सामना करावा लागला असल्याचे सांगितले. तर प्रत्येकी ३ पैकी २ दलित कर्मचार्यांनी कामाच्या ठिकाणी अन्याय्य वागणुक दिली जात असल्याचे सांगितले.

कॅलिफोर्निया विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत केले जात आहे. तसेच अमेरिकेतील इतर विद्यापीठे ही यातून प्रेरणा घेऊन असाच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.


       
Tags: Anti discriminationCal stateCasteDalit
Previous Post

विषमतेविरोधातली काव्यात्मक बंडाळी म्हणजे ‘आरंभाच्या दारात!’

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली हज हाऊसच्या सिईओची भेट – सकारात्मक चर्चा

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली हज हाऊसच्या सिईओची भेट – सकारात्मक चर्चा

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली हज हाऊसच्या सिईओची भेट - सकारात्मक चर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
बातमी

मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

by mosami kewat
July 6, 2026
0

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत दुर्घटनांची मालिका सुरू असतानाच मानखुर्द परिसरात रविवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या...

Read moreDetails
आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !

आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !

July 6, 2026
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

July 6, 2026
पुण्यात वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने लावला 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान'चा नामफलक; महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध

पुण्यात वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने लावला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान’चा नामफलक; महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध

July 6, 2026
हेडगेवारांच्या नाटकासाठी ४५ लाखांचा निधी; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

हेडगेवारांच्या नाटकासाठी ४५ लाखांचा निधी; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

July 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home