Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रशासनातील ओबीसी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात; प्रकाश आंबेडकरांचा इशारा!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 28, 2021
in बातमी
0
NCP आणी RSS, भाजपचे संबंध जगजाहीर!
       

आमचे आरक्षण पूर्ववत करा, त्यानंतरच मतं मागायला या, ही भूमिका ओबीसी समाजाने घ्यावी असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

नागपूर : नागपूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना बाळासाहेब आंबेडकरांनी हा धोक्याचा इशारा दिला. राज्य व केंद्र सरकारच्या संगनमताने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. याचे नोकरी व शैक्षणिक आरक्षणावर सुद्धा परिणाम होतील व तेही धोक्यात आले आहे असा इशारा यापूर्वीच बाळासाहेबांनी दिला होता.

ओबीसी आरक्षणावर निकाल देताना फक्तं एमपीरिकल डेटा हा मुद्दा नसून, कोणाला याची गरज आहे याची निश्चिती करण्याचाही मुद्दा मांडला गेला असल्याचे बाळासाहेबांनी सांगितले. यामुळे जी अवस्था गोवारी, हलबा समाजाची झाली तीच अवस्था ओबीसी समाजातील अधिकाऱ्यांची होऊ शकते असे त्यांनी सांगितले. गोवारी, हलबा अशा काही जाती आदिवासी नाहीत असा निर्णय देण्यात आला होता. यामुळे अनेक वर्षे नोकरीत असलेल्या या जातीतील लोकांना बडतर्फ करण्यात आले. एवढेच नव्हे तर इतकी वर्षे घेतलेला पगारही परत करण्यास सांगितले होते.

नोकरीला लागलेल्या ओबीसींची आता समाजाला जागृत करण्याची जबाबदारी आहे. हे धोके त्यांनी समाजाला समजावून सांगावे व या प्रश्नातून मार्ग काढावा. अन्यथा येत्या एक ते दिड वर्षात जी अवस्था गोवारी, हलबा समाजाची झाली तीच अवस्था नोकरीत असणाऱ्या ओबीसींची होताना दिसते असा इशारा बाळासाहेबांनी दिला.

अमच्यावतीने आम्ही आंदोलन केले. विधानभवनावर धडक मोर्चा नेला. आता हे आंदोलन जिल्हा व तालुका पातळीवर घेऊन जाण्याचे आमचे नियोजन चालले आहे, असे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत आहेत. तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनी आम्हाला मतं मागायला येऊ नये, असा बोर्ड ओबीसींनी लावावा. मतं मागायची असतील तर आधी आमचं आरक्षण पूर्ववत करा हि भूमिका ओबीसींनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र सरकारने कायदा केला तर अडचण दूर होऊ शकते.

सर्वोच्च न्यायालयाने जो एमपीरिकल डेटा मागितला आहे तो देणे गरजेचे आहे. तो तयार करून आम्हाला द्या. त्यासाठी लागणारा निधी आणी मनुष्यबळ पुरवायला आम्ही तयार आहोत, असा ठराव करून महाराष्ट्र सरकारने तो जनगणना आयोगाकडे पाठवावा. असे केले तर त्यांना तो डेटा तयार करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे एमपीरिकल डेटा ची अडचण दूर होऊन ओबीसी आरक्षण पूर्ववत होऊ शकते असा सल्ला बाळासाहेब आंबेडकरांनी यावेळी दिला.


       
Tags: bjpCongressNCPobcPrakash AmbedkarreservationShivsenaआरक्षणओबीसीकाँग्रेसप्रकाश आंबेडकरभाजपराष्ट्रवादीशिवसेना
Previous Post

NCP आणी RSS, भाजपचे संबंध जगजाहीर!

Next Post

२५व्या भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन.

Next Post
२५व्या भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन.

२५व्या भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पीक विमा कंपन्यांचा ५०,००० कोटी नफा : शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभारलेले साम्राज्य
अर्थ विषयक

पीक विमा कंपन्यांचा ५०,००० कोटी नफा : शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभारलेले साम्राज्य

by mosami kewat
September 17, 2025
0

- संजीव चांदोरकर गेल्या ५ वर्षात देशात पीक विमा धंद्यातून विमा कंपन्यांनी तब्बल ५०,००० कोटी रुपये नफा कमावला आहे. त्यापैकी...

Read moreDetails
अक्कलकोट तालुक्यात नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन

Solapur : अक्कलकोट तालुक्यात नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन

September 17, 2025
मुंबई विद्यापीठात भंतेजींवर सुरक्षारक्षकांची मारहाण; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव!

मुंबई विद्यापीठात भंतेजींवर सुरक्षारक्षकांची मारहाण; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव!

September 17, 2025
Nashik : वंचितांना न्याय देणे हाच खरा आंबेडकरवाद! – चेतन गांगुर्डे

Nashik : वंचितांना न्याय देणे हाच खरा आंबेडकरवाद! – चेतन गांगुर्डे

September 17, 2025
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

September 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home