Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गोढाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट बॉडी, महिला व युवक आघाडीच्या शाखांचे उत्साहात उद्घाटन!

mosami kewat by mosami kewat
November 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गोढाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट बॉडी, महिला व युवक आघाडीच्या शाखांचे उत्साहात उद्घाटन!
       

‘गाव तेथे शाखा, शाखा तेथे नेतृत्व’ या संकल्पनेतून ग्रामीण भागात राजकीय परिवर्तनाची पायाभरणी; गावागावांतून नवे नेतृत्व निर्माण करण्याचा निर्धार!

रेणापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय परिवर्तनाच्या विचारांना ग्रामीण भागात बळ देण्यासाठी ‘गाव तेथे शाखा’ या संकल्पनेअंतर्गत मौजे गोढाळा, ता. रेणापूर येथे रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट बॉडी, महिला आघाडी आणि युवक आघाडीच्या शाखांचे उद्घाटन व नामफलक अनावरण उत्साहात करण्यात आले. जिल्हा महासचिव ॲड. रोहित सोमवंशी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर आणि युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन गायकवाड यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

राजकीय सत्ता सर्वसामान्यांच्या हातात पोहोचली पाहिजे – ॲड. रोहित सोमवंशी

या वेळी बोलताना जिल्हा महासचिव ॲड. रोहित सोमवंशी म्हणाले की, राजकीय सत्ता काही मोजक्या घराण्यांपुरती किंवा विशिष्ट वर्गाच्या नियंत्रणापुरती मर्यादित न राहता ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. गावातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, कामगार आणि वंचित घटकांमधून नवे राजकीय नेतृत्व निर्माण झाले पाहिजे.

गावातील सामान्य कार्यकर्त्यालाही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि संसदेपर्यंत नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. गावातील शेवटच्या वस्तीवरील सामान्य युवक आणि कार्यकर्त्याचाही राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग असला पाहिजे. त्याला नेतृत्वाची संधी मिळून त्याच्या प्रश्नांना राजकीय व्यासपीठ मिळाले पाहिजे. युवकांनी केवळ राजकारणाचे प्रेक्षक न राहता लोकशाहीच्या निर्णयप्रक्रियेतील सक्रिय भागीदार बनले पाहिजे.

‘गाव तेथे शाखा’ या संकल्पनेतून ग्रामीण भागातील संघटनात्मक बांधणी मजबूत करून सामान्य माणूस, महिला आणि युवकांना राजकीय प्रक्रियेत नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने गोढाळा येथील तिन्ही शाखांचे उद्घाटन महत्त्वपूर्ण ठरले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

गाव, वस्ती आणि वाड्यापर्यंत संघटन पोहोचविणे आवश्यक – मंजुषा निंबाळकर

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या राजकीय परिवर्तनाच्या विचारांवर आधारित संघटनात्मक काम गाव, वस्ती आणि वाड्यापर्यंत पोहोचविणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक गाव, वस्ती आणि वाड्यापर्यंत संघटन पोहोचविण्यासाठी शाखेतील प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि नागरी प्रश्न समजून घेऊन ते लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महिलांना राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक नेतृत्वाच्या संधी मिळाल्या पाहिजेत. गाव, वस्ती आणि वाड्यापासून सुरू झालेली संघटनात्मक बांधणी अधिक व्यापक करून राजकीय परिवर्तनाची चळवळ यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

गाव तेथे शाखा, शाखा तेथे युवक नेतृत्व! – नितीन गायकवाड

युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन गायकवाड यांनी युवकांच्या संघटनात्मक भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, युवकांना केवळ सभा, मोर्चे, आंदोलने किंवा पक्षाच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि नेतृत्वाच्या संधी दिल्या पाहिजेत. गावातील विकासकामे, शिक्षण, रोजगार, आरोग्य, पाणी, रस्ते, ग्रामपंचायतीचा कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर युवकांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडली पाहिजे.

ग्रामीण भागातील बेरोजगारी, शिक्षणातील अडचणी, शेतीचे प्रश्न, व्यसनाधीनता, विद्यार्थ्यांच्या समस्या, महिलांची सुरक्षितता आणि युवकांच्या रोजगाराचे प्रश्न यांना संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने व्यासपीठ मिळाले पाहिजे. युवकांनी स्वतःच्या प्रश्नांसाठी स्वतः नेतृत्व करावे. त्यांच्यामध्ये स्वतंत्र निर्णयक्षमता, वैचारिक स्पष्टता आणि नेतृत्वगुण विकसित झाले पाहिजेत.

युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानवादी विचारांचा अभ्यास करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. ‘गाव तेथे शाखा, शाखा तेथे युवक नेतृत्व आणि युवक नेतृत्वातून लोकशाहीचे सार्वत्रिकीकरण’ हा युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांचा विचार युवकांनी कृतीत उतरवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या शाखा उद्घाटन समारंभास जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, डॉ. निंबाळकर सर, भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष कमलाकर चिकटे, रेणापूर तालुकाध्यक्ष रतन आचार्य, महिला आघाडीच्या नेत्या सुजाता कांबळे, तालुका सचिव अतुल कांबळे, सम्राट गोडबोले, नितीन ढाले, ज्येष्ठ मार्गदर्शक बबन डोंगरे, पंढरी कांबळे यांच्यासह गावातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाखेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद कांबळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी तुकाराम आदोडे, किशन कांबळे, अच्युत कांबळे व पंढरी कांबळे यांची, तर महासचिवपदी बाबासाहेब कांबळे, संजय कांबळे व भीमराव कांबळे यांची निवड करण्यात आली.

सचिवपदी तातेराव कांबळे, भिवाजी कांबळे व सुधाकर कांबळे, सहसचिवपदी संपत कांबळे, संघटकपदी सुग्रीव कांबळे, सहसंघटकपदी दयानंद थिट्टे आणि कोषाध्यक्षपदी बालाजी कांबळे यांची निवड झाली. सदस्य म्हणून गौतम कांबळे, मधुकर कांबळे, बाबासाहेब आचार्य, भगवान मादळे, उत्तम कांबळे, संभाजी कांबळे, कचरू कांबळे व नागनाथ कांबळे यांचा समावेश आहे.

महिला आघाडीच्या अध्यक्षपदी वंदना कांबळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी आम्रपाला कांबळे, महादेवी कांबळे, गीता कांबळे, शकुंतला कांबळे व सुमन कांबळे यांची, तर महासचिवपदी रुक्मिणबाई कांबळे व दिव्या शिंदे यांची निवड झाली.

सचिवपदी शांताबाई कांबळे, रंजना कांबळे, सारजाबाई कांबळे व शिला कांबळे, संघटकपदी मनीषा कांबळे, सहसंघटकपदी मुक्ताबाई कांबळे, कोषाध्यक्षपदी अलका मादळे आणि सल्लागारपदी रेखा कांबळे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून सत्यशील कांबळे, धोंडाबाई कांबळे, भामाबाई कांबळे, रूपा कांबळे, रंजना बालाजी कांबळे, रंभा कांबळे, संगीता कांबळे व महानंदा कांबळे यांचा समावेश आहे. 

युवक आघाडीच्या अध्यक्षपदी धम्मानंद कांबळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनोद कांबळे, बालाजी आदोडे, प्रभाकर कांबळे व सचिन कांबळे यांची, तर महासचिवपदी प्रफुल्ल कांबळे, शरद कांबळे व भैय्यासाहेब कांबळे यांची निवड झाली.

सचिवपदी जयभीम कांबळे, शिलवंत कांबळे व विकास आचार्य, सहसचिवपदी दिलीप कांबळे, संघटकपदी राम कांबळे, सहसंघटकपदी पोपट कांबळे, कोषाध्यक्षपदी माधव कांबळे आणि सल्लागारपदी अविनाश कांबळे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून माधव कांबळे, विठ्ठल कांबळे, बाबासाहेब कांबळे, विजयकुमार मादळे, विश्वनाथ थिट्टे, शरद कांबळे व बुद्धभूषण कांबळे यांचा समावेश आहे. नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारिणीच्या माध्यमातून गावात वंचित बहुजन आघाडीचे संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


       
Tags: GhodhalaMaharashtraPoliticalRenapurVanchit Bahujan Aghadi
Previous Post

प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोढाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट बॉडी, महिला व युवक आघाडीच्या शाखांचे उत्साहात उद्घाटन!
बातमी

गोढाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट बॉडी, महिला व युवक आघाडीच्या शाखांचे उत्साहात उद्घाटन!

by mosami kewat
November 16, 2026
0

‘गाव तेथे शाखा, शाखा तेथे नेतृत्व’ या संकल्पनेतून ग्रामीण भागात राजकीय परिवर्तनाची पायाभरणी; गावागावांतून नवे नेतृत्व निर्माण करण्याचा निर्धार! रेणापूर...

Read moreDetails
प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन

प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन

November 16, 2026
भूम येथील दलित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ॲट्रॉसिटीचे कलम न लावणाऱ्या व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची  मागणी

भूम येथील दलित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ॲट्रॉसिटीचे कलम न लावणाऱ्या व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची  मागणी

November 16, 2026
छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर

छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर

November 15, 2026
महागाईचे विष!

महागाईचे विष!

November 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home