Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; मायक्रो फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीचा तगादा न लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

mosami kewat by mosami kewat
November 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; मायक्रो फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीचा तगादा न लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
       

औरंगाबाद : मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांकडून शेतकरी, शेतमजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना होणाऱ्या कर्जवसुलीच्या त्रासाविरोधात वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्या, खासगी सावकार आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित कामगारांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धतीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व घटकांची बैठक घेऊन आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज संबंधितांची बैठक घेऊन कर्जवसुलीच्या नावाखाली नागरिकांना त्रास देऊ नये, असे आदेश दिले. तसेच मायक्रो फायनान्स कंपन्या किंवा खासगी सावकारांकडून त्रास दिला जात असल्यास तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जाहीर केला आहे.

या निर्णयामुळे वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित झाले असून, पीडित शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संबंधित कंपन्या किंवा खासगी सावकारांकडून कर्जवसुलीसाठी त्रास दिला जात असल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तेथून समाधान न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, पश्चिम शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे आणि पूर्व शहराध्यक्ष मतीन पटेल यांनी केले आहे.


       
Tags: AgricultureaurangabadFarmerloanMaharashtraMicro financePoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला निर्बंध घालणारे परिपत्रक रद्द करण्यासाठी समविचारी विद्यार्थी संघटनांचे एकत्रित आंदोलन; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ताकदीने सहभाग!

Next Post

जीडीपीच्या आकड्यांपलीकडे : सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीचे काय?

Next Post
जीडीपीच्या आकड्यांपलीकडे : सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीचे काय?

जीडीपीच्या आकड्यांपलीकडे : सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीचे काय?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home