नांदेड : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने भेट घेऊन सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले.
या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी शिंदे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले. आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात कुटुंबाला आधार देण्यासोबतच त्यांच्या मुलीच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याबरोबरच संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि भविष्याची काळजी घेणे, ही वंचित बहुजन आघाडीची सामाजिक बांधिलकी असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.
या सांत्वन भेटीवेळी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष राज आटकोरे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, के. एच. वने, बालाजी सूर्यतळे, राहुल चौंदंते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाच्या दुःखात वंचित बहुजन आघाडी सहभागी असून, त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी संघटना खंबीरपणे पाठीशी उभी राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला






