Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

mosami kewat by mosami kewat
October 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार
       

नांदेड : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने भेट घेऊन सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले.

या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी शिंदे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले. आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात कुटुंबाला आधार देण्यासोबतच त्यांच्या मुलीच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आले. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याबरोबरच संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि भविष्याची काळजी घेणे, ही वंचित बहुजन आघाडीची सामाजिक बांधिलकी असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.

या सांत्वन भेटीवेळी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष राज आटकोरे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, के. एच. वने, बालाजी सूर्यतळे, राहुल चौंदंते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाच्या दुःखात वंचित बहुजन आघाडी सहभागी असून, त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी संघटना खंबीरपणे पाठीशी उभी राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला


       
Tags: AgricultureFarmerloanMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

गणेश बोरकर यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

Next Post

वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश

Next Post
वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश

वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश
बातमी

वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश

by Akash Shelar
October 27, 2026
0

अकोट : काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. श्याम नेमाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अकोट शहराध्यक्ष श्री. संदेश घनबहादूर...

Read moreDetails
माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

October 27, 2026
गणेश बोरकर यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

गणेश बोरकर यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

October 27, 2026
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

दडपशाहीला न जुमानता ज्ञानेश कुमार विरोधात मोर्चा होणारच !

October 27, 2026
महाड चवदार तळे सत्याग्रहानंतर पाण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर

महाड चवदार तळे सत्याग्रहानंतर पाण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर

October 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home