Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गणेश बोरकर यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

Akash Shelar by Akash Shelar
October 27, 2026
in बातमी, राजकीय
0
गणेश बोरकर यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश
       
चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकरांशी केली चर्चा

अकोला : वंचित बहुजन आघाडीने सामाजिक आणि राजकीय विस्ताराच्या दृष्टीने चर्मकार समाजाला पक्षाच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी करून घेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. चर्मकार समाजातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते तथा नेते डॉ. गणेश बोरकर यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला. अकोल्यातील पक्ष कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

डॉ. गणेश बोरकर हे चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष असून, अकोल्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संत रविदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक प्रतिष्ठानच्या संस्थापक सदस्यांमध्येही त्यांचा समावेश आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे स्थानिक सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना उधाण आले आहे.

पक्षप्रवेश पार पडल्यानंतर डॉ. बोरकर यांच्यासह चर्मकार समाजातील इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वोच्च नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत चर्मकार समाजाच्या रोजच्या समस्या, सामाजिक न्याय आणि सध्या राज्यात तापलेला अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा यावर सखोल विचारविनिमय करण्यात आला.

विशेष म्हणजे, राज्यात चर्चेत असलेल्या अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणविरोधी लढ्यात डॉ. बोरकर यांनी अत्यंत महत्त्वाची आणि आक्रमक भूमिका बजावली आहे. या विषयावर राज्यातील विविध ठिकाणी त्यांनी दिलेल्या जाहीर भाषणांना मोठा प्रतिसाद मिळाला असून, या आंदोलनाच्या माध्यमातून चर्मकार समाजाला बौद्ध समाजासोबत वैचारिक व सामाजिक पातळीवर जोडण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले आहेत.

चर्मकार समाजातील अशा प्रभावी सामाजिक नेतृत्वाला पक्षाशी जोडण्याच्या या घडामोडीकडे वंचित बहुजन आघाडीच्या आगामी सामाजिक-राजकीय विस्ताराच्या दृष्टीने पाहिले जात आहे. डॉ. बोरकर यांच्या प्रवेशामुळे चर्मकार समाजाचे प्रलंबित प्रश्न पक्षाच्या राजकीय व्यासपीठावर अधिक ठळकपणे मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, या प्रवेशाचा आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे, पश्चिम शहर कार्याध्यक्ष हाजी मजहर खान, पश्चिम शहर महासचिव गजानन दादा गवई, पूर्व शहर महासचिव दामोदरजी जगताप, तालुका प्रसिद्धी प्रमुख मोहन तायडे, उत्तमराव खंडारे, शरद इंगोले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: AkolaMaharashtrapoliticsVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दडपशाहीला न जुमानता ज्ञानेश कुमार विरोधात मोर्चा होणारच !

Next Post

माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकरांशी चर्चा; उपवर्गीकरणविरोधी लढ्यातील महत्त्वाचा चेहरा वंचितच्या गोटात
बातमी

चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकरांशी चर्चा; उपवर्गीकरणविरोधी लढ्यातील महत्त्वाचा चेहरा वंचितच्या गोटात

by mosami kewat
October 27, 2026
0

अकोला : वंचित बहुजन आघाडीने सामाजिक आणि राजकीय विस्ताराच्या दृष्टीने चर्मकार समाजाला पक्षाच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी करून घेण्याच्या दिशेने पाऊल...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश

वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश

October 27, 2026
माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

October 27, 2026
गणेश बोरकर यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

गणेश बोरकर यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

October 27, 2026
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

दडपशाहीला न जुमानता ज्ञानेश कुमार विरोधात मोर्चा होणारच !

October 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home