ॲड. प्रकाश आंबेडकर : सरकारच्या दडपशाहीला न घाबरता लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा !
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु सरकारने या मोर्चा राणीबाग ते जिजामाता उद्यान या परिसराची परवानगी नाकारली असून यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत दडपशाहीला न जुगनता ज्ञानेश कुमार विरोधात मोर्चा होणार असून त्यात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
ॲड. आंबेडकरांनी म्हटले की, सरकारने जे करायचं तेच केलं उद्याच्या ज्ञानेश कुमार विरोधातील मोर्चाला राणीबाग, जिजामाता उद्यान या परिसराची परवानगी नाकारली. दडपशाही करायला सुरुवात झाली आहे कोणीही या दडपशाहीला घाबरायच नाही. उद्या सर्व फुले, शाहू, आंबेडकरवादी जनता, धर्मनिरपेक्ष जनता आणि तमाम नागरिकांना माझे आवाहन आहे की, आपण छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन या ठिकाणी दुपारी.३.०० वाजता उपस्थित राहून आम्ही आमचे स्वातंत्र्य घालवणार नाही, आमचा मताचा अधिकार घालवणार नाही. हे सरकारला ठणकावून सांगण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा.






