Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

mosami kewat by mosami kewat
September 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा
       
अहिल्यानगर : जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साडेपंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुजितकुमार क्षीरसागर यांनी तपासी अधिकाऱ्यांना दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी लक्ष्मण नवनाथ साळवे याच्यासह रामदास साळवे आणि भरत साळवे हे आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. हे आरोपी पीडित बालिकेच्या कुटुंबाला ‘केस मिटवून घ्या, नाहीतर जिथे दिसताल तिथे हातपाय तोडून जिवे मारू’ अशी थेट धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण करत आहेत. 

वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उप पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट देऊन या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. आरोपींना पुढील २४ ते ४८ तासांत अटक करून गजाआड करावे तसेच पीडित कुटुंबाला आवश्यक पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, मागणीची दखल घेत डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर यांनी तपासी अधिकाऱ्यांना तपासाची चक्रे वेगाने फिरवून फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले. दिलेल्या मुदतीत आरोपींना अटक न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच उप पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.

यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष पोपट शेटे, सुधीर ठोंबे, विजय गायकवाड, बुवासाहेब चव्हाण, अतिश पारवे, चंद्रकांत नेटके, अंकुश साळवे, दादा साळवे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पीडित कुटुंबीय उपस्थित होते.

Tags: crimejamkhedMaharashtrapoliceVanchit Bahujan Aghadi
Previous Post

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

Next Post

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home