दिंडोरी : वंचित बहुजन आघाडी, दिंडोरी तालुक्याच्या वतीने भव्य पक्षप्रवेश व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच वंचित-बहुजन समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध सामाजिक व राजकीय पार्श्वभूमीतील अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य सदस्य डॉ. चित्रा कुऱ्हे, जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत आहिरे तसेच युवा जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे माजी महासचिव देवसिंग खरे युवक तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे यांचीप्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे म्हणाले, बहुजन समाजाने मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने मुठ बांधली, तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिका बजावेल. बहुजनांची एकजूट हीच आमची ताकद असून आगामी काळात सत्ता वंचित बहुजन आघाडीच्या हाती असेल.
मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटनात्मक बांधणी, युवक व महिलांचा राजकीय सहभाग तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावागावात संघटना मजबूत करून वंचित, बहुजन, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक तसेच सर्व उपेक्षित घटकांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेजवळ व महासचिव समाधान शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण गायकवाड, अमोल सोनवणे, भावेश काळे, विवेक दिवे रवींद्र शार्दुल अमोल घोलप ऋषिकेश गांगुर्डे केदु थाट सिंगार यशोदीप सोनवणे आकाश गांगुर्डे अक्षय सितान स्वप्निल धुळे राहुल जाधव आदर्श खरे मनीषा सोनवणे शिला खरे शालिनी सोनवणे यांच्यासह दिंडोरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
‘बहुजनांची एकजूट, वंचितांची सत्ता’ या निर्धाराने आगामी काळात दिंडोरी तालुक्यात संघटनात्मक विस्तार अधिक जोमाने करण्याचा संकल्प मेळाव्यात करण्यात आला.






