Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

mosami kewat by mosami kewat
August 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

वंचित बहुजन आघाडीचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन

तिवसा :
मोर्शी तालुक्यातील भांबोरा गावातील शेतशिवारात २७ ऑगस्ट रोजी शेतकरी चरणदास इखे यांच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे इखे यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. यावेळी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला वनविभागाच्या वतीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, मोर्शी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

अस्मानी-सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर आता वाघाच्या हल्ल्यामुळे मोठे संकट ओढवले आहे. भांबोरा परिसरासह तिवसा तालुक्यातील करजगाव, वरूडा, दापोरी, जावरा, फत्तेपूर तसेच इतर गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित गावांना भेटी देऊन ग्रामस्थांची बैठक घ्यावी, वाघाच्या संभाव्य हालचालींबाबत नागरिकांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.

Also Read : ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 

निवेदन सादर करताना जिल्हा महासचिव सागर भवते यांच्यासह तिवसा तालुका अध्यक्ष मनीष खरे, मोर्शी तालुका अध्यक्ष अमोल सरवटकर, प्रवीण निकाळजे, भुजंग वावरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

भांबोरा येथे झालेल्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मोर्शी व तिवसा तालुक्यातील नागरिकांनी वनविभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नयेत, असे आवाहन सागर भवते यांनी केले.

Tags: BhamboaraFarmerMaharashtraPoliticalTiger AttackTivsaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !
बातमी

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

by mosami kewat
August 29, 2026
0

...अन्यथा SC, ST समूह सामाजिक न्याय, आदिवासी मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार – राजेंद्र पातोडे अकोला : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

August 29, 2026
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

August 29, 2026
ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 

ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 

August 29, 2026
आंदोलक आदिवासी भगिनींनी नीरज वाघमारे यांच्या मनगटावर बांधली ‘संघर्षाची राखी’!

आंदोलक आदिवासी भगिनींनी नीरज वाघमारे यांच्या मनगटावर बांधली ‘संघर्षाची राखी’!

August 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home