Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

mosami kewat by mosami kewat
August 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
       
सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट!

पुणे : “आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा निधी चोरण्याचा, त्यांच्या मागण्या दाबण्याचा किंवा हक्क हिरावण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थी आंदोलन करून सरकारला जाब विचारू शकतात, हेच या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी ही विद्यार्थ्यांसोबत आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तातडीने सोडवावा, ” असा घणाघाती इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी दिला. पुणे येथील मांजरी भागातील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला.

या प्रसंगी बोलताना सुजात आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. जिथे जिथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे, तिथे तातडीने चांगल्या दर्जाची मेस सुविधा सुरू झाली पाहिजे, अशी पहिली मागणी त्यांनी केली. तसेच, गडचिरोली येथे वसतिगृहात साप चावून मृत्यू झालेल्या आदिवासी विद्यार्थिनींच्या कुटुंबाला सरकारने प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, असा आग्रह त्यांनी धरला.

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आदिवासी कोट्यामध्ये बनावट व बोगस प्रमाणपत्रे वापरून घुसखोरी केलेल्यांची प्रमाणपत्रे रद्द झाली पाहिजेत आणि आदिवासींचे आरक्षण फक्त मूळ आदिवासींनाच मिळाले पाहिजे. शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही, असा मुद्दा मांडणाऱ्या सरकारच्या भूमिकेचा आणि जीआरचा त्यांनी तीव्र धिक्कार केला. विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकार मागण्या ऐकत नाही, असा थेट टोलाही त्यांनी लगावला. यासोबतच, राज्यातील सर्व आदिवासी वसतिगृहांमध्ये स्वच्छता, जेवणाचा दर्जा, झोपण्यासाठी कॉट/बेड आणि स्वच्छतागृहांची सोय यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे सांगत, या सर्व हॉस्टेल्सचे त्वरित ऑडिट करून सुविधा पुरवण्याची मागणी त्यांनी केली. 

नाशिक कुंभमेळा आणि लाडकी बहीण यांसारख्या योजनांसाठी अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातीचा (ST) निधी मोठ्या प्रमाणावर इतरत्र वळवला जात असल्याचा आरोप करत, या निधीच्या वापराचे ऑडिट जाहीर करावे आणि भविष्यात एससी-एसटी निधी इतरत्र वळवला जाऊ नये यासाठी सरकारने तातडीने कडक कायदा करावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. या सर्व मागण्यांवर वंचित बहुजन आघाडी आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: Adivasi StudentsEducationMaharashtraPoliticalpuneSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

Next Post

नागपूर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा; राजेंद्र पातोडे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न
बातमी

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

by mosami kewat
October 16, 2026
0

दक्षिण सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. सोमनाथ...

Read moreDetails
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home