Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

औरंगाबाद : सुभेदार गेस्ट हाऊस, औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषदेत दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडली. यावेळी त्यांनी राम माधव यांच्या भेटीवरून गंभीर सवाल उपस्थित करत या भेटीतील चर्चेचा खुलासा करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मागील काही महिन्यात आरएसएसचे पूर्वीचे प्रवक्ते राम माधव हे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसएस (ISI) च्या काही रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेत भेटले. या भेटीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी आमची माहिती आहे. हे चार मुद्दे काय होते? याचा खुलासा RSS प्रमुख मोहन भागवत यांनी केला पाहिजे.”

तसेच, या देशात ‘मन की बात’ सांगणारे पंतप्रधान मोदी यांनी आरएसएस आणि राम माधवला आयएसआय (ISI)चे पदाधिकारी, परराष्ट्र खात्याचे अधिकारी यांच्या बरोबर बोलणी करण्याचा अधिकार दिला होता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Also Read : मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

पुढे ते म्हणाले की, या देशातील विरोधी पक्षांचे दुर्दैवी आहे की, विरोधी पक्षनेते यांनी भारतीय सुरक्षा आणि राम माधवच्या भेटी बद्दलचे प्रश्न उपस्थित करतांना दिसत नाहीये.

वंचित बहुजन आघाडीला आता राष्ट्रीय प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. लोकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी याविषयी सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये चर्चा करावी आणि सरकारला जाब विचारावा, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Tags: ISIMaharashtraMohan BhagwatPoliticalPrakash AmbedkarrssVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी
बातमी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

by mosami kewat
August 22, 2026
0

औरंगाबाद : सुभेदार गेस्ट हाऊस, औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ही...

Read moreDetails
मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

August 22, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

August 22, 2026
अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

August 21, 2026
‘विश्वगुरू’ची स्वप्ने आणि जागतिक वास्तवाची धग

‘विश्वगुरू’ची स्वप्ने आणि जागतिक वास्तवाची धग

August 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home