Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
       
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील खासगी नर्सिंग महाविद्यालयांकडून आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करत, संबंधित महाविद्यालयांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास समितीचे माननीय सचिव नांदेड दौऱ्यावर आले असता, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष आतिश ढगे आणि वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक कुलदीप राक्षसमारे यांनी त्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन साद केले.

आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार मिळणाऱ्या शैक्षणिक व शुल्क सवलतींचा योग्य लाभ मिळत आहे की नाही, याची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच खासगी नर्सिंग महाविद्यालयांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अतिरिक्त शुल्क वसूल केले जात असल्याचे आढळल्यास, संबंधित महाविद्यालयांची सखोल चौकशी करून दोषी संस्थांवर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररीत्या वसूल करण्यात आलेले अतिरिक्त शुल्क त्यांना परत मिळवून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींचा सामना करत उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त शुल्क आकारणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा प्रकार असल्याचे आंदोलनाच्या वतीने नमूद करण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा व शुल्क सवलतींचा पूर्ण लाभ मिळवून द्यावा आणि संबंधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन, नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.

Tags: EducationMaharashtranandedNanded Nursing CollegesSamyak Student MovementVanchit Bahujan Aghadi
Previous Post

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

Next Post

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home