Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

परभणीत संतापजनक घटना! ऑटो लावण्यावरून भाजी विक्रेत्याला मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
परभणीत संतापजनक घटना! ऑटो लावण्यावरून भाजी विक्रेत्याला मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

परभणीत संतापजनक घटना! ऑटो लावण्यावरून भाजी विक्रेत्याला मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

परभणी : परभणी तालुक्यातील पेडगाव येथे बाजाराच्या दिवशी दुकानासमोर ऑटो लावण्याच्या कारणावरून भाजी विक्रेते विजय खरात (वय २२) यांना चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत त्यांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीदरम्यान जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही पीडिताने सांगितले.

दरम्यान, उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या विजय खरात यांना मारहाण करणारे संबंधित व्यक्ती रुग्णालयातही आले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडिताकडून सांगण्यात आले. “खून करणारे सुटून येतात, ॲट्रॉसिटीने काही फरक पडत नाही,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचेही पीडिताने सांगितले. (Vegetable Vendor Assault)

Also Read : आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे पीडिताच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित व्यक्तींवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच परभणीतील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन विजय खरात यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

ही घटना परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी या आरोपांप्रकरणी पोलिसांनी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (Vegetable Vendor Assault)

Tags: Atrocity AllegationCasteist AbusecrimeMaharashtraparbhaniparbhani crime newsPoliticalVanchit Bahujan AaghadiVegetable Vendor Assault
Previous Post

आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

Next Post

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल मांडेगाव शाखेकडून स्वातंत्र्यदिन आणि वामनदादा कर्डक जयंती उत्साहात साजरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला जाब
बातमी

साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला जाब

by mosami kewat
August 19, 2026
0

नवी मुंबई : साईनगर, रबाळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली...

Read moreDetails
भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल मांडेगाव शाखेकडून स्वातंत्र्यदिन आणि वामनदादा कर्डक जयंती उत्साहात साजरी

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल मांडेगाव शाखेकडून स्वातंत्र्यदिन आणि वामनदादा कर्डक जयंती उत्साहात साजरी

August 19, 2026
परभणीत संतापजनक घटना! ऑटो लावण्यावरून भाजी विक्रेत्याला मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

परभणीत संतापजनक घटना! ऑटो लावण्यावरून भाजी विक्रेत्याला मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

August 19, 2026
आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

August 19, 2026
पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

August 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home