Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी

mosami kewat by mosami kewat
August 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी
       
कळमनुरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ कळमनुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात निषेध आंदोलन  केले. पालकमंत्र्यांनी केवळ ध्वजारोहणापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातील जनतेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला होता. मात्र, आंदोलन होण्यापूर्वीच पोलिस प्रशासनाने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी “सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है” अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, सामान्य नागरिक तसेच रस्ते, आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस योगदान काय, असा सवालही वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली, हे समजू शकते; मात्र त्याच प्रशासनाने पालकमंत्र्यांचे लक्ष जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे वेधणे अधिक लोकहिताचे ठरेल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना जवळपास तीन तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर नोटीस देऊन त्यांची सुटका करण्यात आली.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते राजू कांबळे, युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद अस्लम, युवा तालुका महासचिव दिनेश पाईकराव, सुशील वाढवे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. “जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहणार,” असा निर्धार वंचित बहुजन युवा आघाडी, कळमनुरी तालुका, जिल्हा हिंगोली यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Tags: HingoliIndipendent dayMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

कळमनुरी: वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मूकबधिर विद्यालयात फळवाटप करून स्वातंत्र्यदिन साजरा

Next Post

राष्ट्रध्वज के अपमान को लेकर प्रकाश आंबेडकर का प्रधानमंत्री मोदी पर निशाना!

Next Post
राष्ट्रध्वज के अपमान को लेकर प्रकाश आंबेडकर का प्रधानमंत्री मोदी पर निशाना!

राष्ट्रध्वज के अपमान को लेकर प्रकाश आंबेडकर का प्रधानमंत्री मोदी पर निशाना!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home