Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धानोरा जहागीर व शिंदगीतील लाभार्थ्यांची मागणी; राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला निवेदन

mosami kewat by mosami kewat
August 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धानोरा जहागीर व शिंदगीतील लाभार्थ्यांची मागणी; राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला निवेदन
       

घरकुलाचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; कायमस्वरूपी इंजिनिअर नियुक्त करा

कळमनुरी : तालुक्यातील धानोरा जहागीर व शिंदगी येथील शबरी आवास योजना, रमाई आवास योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थ्यांचे मागील दोन वर्षांपासून रखडलेले घरकुलाचे हप्ते तात्काळ त्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवानेते राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी पंचायत समिती कळमनुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

घरकुल मंजूर झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी स्वतःच्या आर्थिक क्षमतेनुसार बांधकामाला सुरुवात केली. मात्र, शासनाकडून मिळणारे निधीचे हप्ते वेळेवर प्राप्त होत नसल्याने अनेक घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत रखडले आहे. यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पावसाळ्यात कुटुंबाच्या निवाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

दरम्यान, संबंधित सर्कल इंजिनिअरची वारंवार बदली अथवा नियुक्ती होत असल्याने घरकुलाच्या बांधकामासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, मोजमाप आणि बांधकामाची पाहणी करून घेण्यात लाभार्थ्यांना अडचणी येत असल्याची तक्रार करण्यात आली. इंजिनिअरच्या अनुपलब्धतेमुळे घरकुलाच्या कामांना विलंब होत असून, लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या समस्येबाबत लाभार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवानेते राजू कांबळे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर कांबळे यांनी पंचायत समिती कळमनुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते दोन दिवसांच्या आत त्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी ठाम मागणी केली.

तसेच, संबंधित सर्कलसाठी कायमस्वरूपी सर्कल इंजिनिअरची नियुक्ती करावी, जेणेकरून इंजिनिअरच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे घरकुलाच्या कामात निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतील आणि लाभार्थ्यांना वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन मिळेल, अशी मागणीही करण्यात आली.

गरीब व गरजू कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन रखडलेले हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावेत आणि घरकुलाची कामे पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवानेते राजू कांबळे, युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद अस्लम, युवा तालुका महासचिव दिनेश पाईकराव, युवा तालुका सचिव जयभीम डोंगरे, धम्मपाल पाईकराव, दादाराव खंदारे, नागेश थोरात, समाधान पाईकराव यांच्यासह घरकुल लाभार्थी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.


       
Tags: Government SchemesKalamnuri Housing SchemeMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा – राजेंद्र पातोडे

Next Post

युपीआयवर शुल्क लागू होणार? अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचा डोळा आणि ‘डेटा’चे राजकारण

Next Post
युपीआयवर शुल्क लागू होणार? अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचा डोळा आणि ‘डेटा’चे राजकारण

युपीआयवर शुल्क लागू होणार? अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचा डोळा आणि 'डेटा'चे राजकारण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home