Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शेवगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

mosami kewat by mosami kewat
August 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शेवगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
       
शेवगाव : बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बन्नूभाई शेख, धोंडिराम मासाळकर, सादिक पठाण आणि अफसर शेख यांनी रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी शेवगाव येथील विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पक्षात ‘घरवापसी’ केली.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य प्रा. किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शाहुराव खंडागळे, कल्याणराव भागवत पाटील, तालुकाध्यक्ष शेख प्यारेलालभाई, उपाध्यक्ष अरुण झांबरे पाटील, विशाल इंगळे, युवा तालुका उपाध्यक्ष सागर गरुड, विष्णु वीर, रज्जाक सैय्यद, दिलीप वाघमारे, ज्येष्ठ मार्गदर्शक हाजी मुसाभाई, राजूशेठ आहुजा यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. किसन चव्हाण म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्यांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. इतर पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा केवळ वापर केला जातो; मात्र वंचित बहुजन आघाडीकडे सत्ता किंवा पैसा नसला तरी कार्यकर्त्यांना मान-सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा दिली जाते.”

कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले की, कार्यकर्त्यांना काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने सामाजिक भान ठेवून निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करावे. भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी ही निर्णायक राजकीय शक्ती म्हणून पुढे येईल. आजही विरोधी पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडी प्रभावीपणे बजावत असून शेतकरी, विद्यार्थी, कामगार, बेरोजगार, महिला तसेच भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचे काम पक्षाकडून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव भागवत पाटील, तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल, उपाध्यक्ष अरुण झांबरे पाटील आणि युवा तालुका उपाध्यक्ष सागर गरुड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष शाहुराव खंडागळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुरेश खंडागळे यांनी मानले.

Tags: MaharashtraPoliticalShevgaonVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आदिवासींच्या हक्काच्या निधी लूट प्रकरणी श्वेतपत्रिका काढा– राजेंद्र पातोडे

Next Post

खुलताबाद रस्त्यावरील धोकादायक दुभाजकाचा वंचित बहुजन आघाडीने केला प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’

Next Post
खुलताबाद रस्त्यावरील धोकादायक दुभाजकाचा वंचित बहुजन आघाडीने केला प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’

खुलताबाद रस्त्यावरील धोकादायक दुभाजकाचा वंचित बहुजन आघाडीने केला प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न
बातमी

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

by mosami kewat
October 16, 2026
0

दक्षिण सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. सोमनाथ...

Read moreDetails
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home