Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा

mosami kewat by mosami kewat
August 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे 'मंडल विजय दिवस' उत्साहात साजरा

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे 'मंडल विजय दिवस' उत्साहात साजरा

       

अकोला : वंचित बहुजन आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या सूचनेनुसार शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी अशोक वाटिका, अकोला येथे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. एम. आर. इंगळे यांनी आपल्या मनोगतात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्रीपद नाकारून मंडल आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रगतीला मोठी चालना मिळाली. त्यामुळे ७ ऑगस्ट हा दिवस सर्व ओबीसी बांधवांनी ‘मंडल विजय दिवस’ म्हणून उत्साहात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे होते. यावेळी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, केंद्रीय सदस्य ॲड. खतीब साहेब, केंद्रीय सदस्या अरुंधती ताई शिरसाट, प्रमुख वक्ते प्रा. एम. आर. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष वानखडे सर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपाली ताई खंडारे, युवक आघाडी महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष निलेश देव, हाजी मजहर खान, महानगर महासचिव गजानन दादा गवई, दामोदर जगताप, माजी गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, बुलढाणा प्रभारी प्रदीप वानखडे, नगरसेवक पराग गवई, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामानिक, अशोक दारोकर, गोरसिंग राठोड, डॉ. धर्माळ, पवन बुटे, चरण इंगळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मंगला ताई शिरसाट, अर्चना ताई डाबेराव, महासचिव शरद इंगोले, रोशन पुंडकर, सुमित नवलकर, बबलू शिरसाट, अशोकभाऊ शिरसाट, शोभाताई शेळके, मनीष वानखेडे, प्रसिद्धी प्रमुख मोहन तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मंडल विजय दिवस’चे औचित्य साधून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांचा जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जे. पी. राऊत, तुळशीराम चव्हाण, संजय पुंडकर, कांतिराम गहिले, वासुदेवराव टीकार, चित्राताई वणवे, शोभाताई शेळके, शोभाताई मुळे, चरणभाऊ चव्हाण, प्रमोद चांदूरकर, इरफान अली शेख, साबीर भाई, श्रीरामजी बोपटे, श्यामलाल भाऊ लोध, लोध ताई, अनिलभाऊ गणगणे आणि अनिलभाऊ बोर्डे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदीप चोरे आणि गोपाल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन दादा गवई यांनी केले, तर आभार प्रदर्शन किशोर जामानिक यांनी केले.


       
Tags: AkolaMaharashtraMandal Vijay DiwasPoliticalPrakash Ambedka
Previous Post

८५० खासदारांची संसद : लोकशाहीचा विस्तार की जमावतंत्राचा प्रयोग?

Next Post

भिंतीपलीकडचा ‘भूतान’

Next Post
भिंतीपलीकडचा 'भूतान'

भिंतीपलीकडचा 'भूतान'

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न
बातमी

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

by mosami kewat
October 16, 2026
0

दक्षिण सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. सोमनाथ...

Read moreDetails
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home