Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे – अॅड. अरविंद तायडे

mosami kewat by mosami kewat
August 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे – अॅड. अरविंद तायडे
       
पुणे : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे यांनी केली.

स्वारगेट येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नेते वसंत साळवे उपस्थित होते.

यावेळी अॅड. अरविंद तायडे यांनी सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचा निर्णय शासनाने जनगणनेनंतरच लागू करावा, अशी भूमिका मांडली. तसेच, तोपर्यंत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातींमधील कोणत्याही व्यक्तीने महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचा गौरव करत त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ही मागणी वंचित बहुजन आघाडीची असल्याचे स्पष्ट केले.

या अभिवादन सभेला नागेश भोसले, ओंकार कांबळे, अभिजीत बनसोडे, रफिक शेख, सचिन भडकवाड, हिराभाऊ वाघमारे, जीवन रोकडे, माणिक लोंढे, नितीन कांबळे, शुभांगी काकडे, प्रमोद कदम, सिद्धेश्वर झेंडे, प्रतिभाताई कांबळे, मुक्तेश्वर माने, दिलीप क्षेत्रे, सोमनाथ लोंढे, हरी वाघमारे, प्रभाकर सरोदे, जॉर्ज मदणकर, राकेश पवार, बाळासाहेब बनसोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सचिव प्रा. बी. पी. सावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला शहर महासचिव अॅड. रेखाताई चौरे यांनी केले.

Tags: Annabhau Sathe JayantiMaharashtraPoliticalpune
Previous Post

डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे गुरु पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रवचनमालिका, बौद्धाचार्य व पाली प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

Next Post

अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन

Next Post
अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन

अमित शहा गो बॅक! वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!
बातमी

हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : फुले-शाहू-आंबेडकरी विचार, साहित्य आणि शिक्षणाला मनुवादाच्या विरोधातील असल्याच्या कारणावरून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

October 2, 2026
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

October 2, 2026
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

October 2, 2026
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home