Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावत रचला नवा इतिहास

mosami kewat by mosami kewat
July 19, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावत रचला नवा इतिहास
       

टोकियो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन २०२६ स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर केली. बीडब्ल्यूएफ सुपर-७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने यजमान जपानच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीचा २१-१७, २१-१७ अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. या विजयासह जपान ओपन जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली.

जवळपास दोन वर्षांनंतर बीडब्ल्यूएफ स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या सिंधूने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. सुमारे ५० मिनिटे रंगलेल्या सामन्यात तिने यामागुचीला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.

पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. एका टप्प्यावर सामना १७-१७ असा बरोबरीत असताना सिंधूने सलग चार गुणांची कमाई करत पहिला गेम २१-१७ असा आपल्या नावावर केला. निर्णायक क्षणी तिने अचूक स्मॅश आणि वेगवान फटक्यांच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर दबाव कायम ठेवला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासूनच आघाडी घेत सामना आपल्या नियंत्रणात ठेवला. ८-३, १४-७ आणि १६-१२ अशी आघाडी घेत तिने यामागुचीला पुनरागमनाची संधी दिली नाही. अखेरीस दुसराही गेम २१-१७ असा जिंकत तिने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.


       
Tags: BadmintonchampionJapanMaharashtraPoliticalPV Sindhusports
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; रबाळे येथील आदिवासीपाड्यातील शौचालय दुरुस्तीला सुरुवात!

Next Post

आळशी नव्हे, संधीपासून वंचित! उच्च शिक्षणाच्या आकडेवारीतून उलगडलेले वास्तव

Next Post
आळशी नव्हे, संधीपासून वंचित! उच्च शिक्षणाच्या आकडेवारीतून उलगडलेले वास्तव

आळशी नव्हे, संधीपासून वंचित! उच्च शिक्षणाच्या आकडेवारीतून उलगडलेले वास्तव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home