Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; रबाळे येथील आदिवासीपाड्यातील शौचालय दुरुस्तीला सुरुवात!

mosami kewat by mosami kewat
July 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; रबाळे येथील आदिवासीपाड्यातील शौचालय दुरुस्तीला सुरुवात!
       
नवी मुंबई : रबाळे येथील आदिवासीपाड्यातील मोडकळीस आलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था व परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांची दखल घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्यामुळे शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

आदिवासीपाड्यातील सार्वजनिक शौचालय अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यावर धोकादायक झाडांच्या फांद्या वाढल्या होत्या. तसेच परिसरात वीजेची सुविधा नसल्याने स्थानिक आदिवासी बांधवांना अंधारात जीवन जगावे लागत असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबईचे महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, शौचालयाच्या दुरुस्तीसोबतच परिसरात वीजपुरवठा आणि इतर नागरी सुविधांची मागणी करत ७ जुलै २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे आणि आदिवासीपाड्यातील कार्यकर्त्यांनी घणसोली वॉर्ड कार्यालयात निवेदन सादर केले. या मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून उर्वरित प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लागावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags: MaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

E10 पेट्रोलचा पर्याय कायम ठेवा आणि इंधनाचे दर कमी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावत रचला नवा इतिहास

Next Post
पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावत रचला नवा इतिहास

पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावत रचला नवा इतिहास

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home