नांदेड : ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर आणि जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हिप्परगा थडी येथील मुस्लिम समाजातील युवा बांधवांसह भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे हिप्परगा थडी परिसरात वंचित बहुजन आघाडीची ताकद आणखी वाढली असून सामाजिक न्याय, संविधान आणि सर्वसमावेशक राजकारणावर जनतेचा वाढता विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्य, वंचित आणि उपेक्षित समाजघटकांच्या न्यायासाठी लढणारी चळवळ आहे. पक्षात प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील.”





