Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धमक्यांना घाबरणार नाही! दादा भुसेंच्या पोस्टरला काळे फासत मुंबईत सम्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
July 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धमक्यांना घाबरणार नाही! दादा भुसेंच्या पोस्टरला काळे फासत मुंबईत सम्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन
       
मुंबई : टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच आंदोलनकर्त्यांना धमक्या देणे तात्काळ थांबवावे, अन्यथा पुन्हा दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिला आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने १ जुलै रोजी मालेगाव येथे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत टीईटी पेपरफुटी संदर्भातील १२ मागण्यांचे निवेदन दादा भुसे यांना देण्यात आले. तसेच या मागण्यांमध्ये टीईटी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणी करण्यात आली होती.

आठ दिवसांच्या आत या मागण्या मान्य न झाल्यास दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनाच्या वतीने देण्यात आला होता. दरम्यान, दादा भुसे यांच्या काही कार्यकर्त्यांकडून आंदोलनकर्ते व विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलनासाठी आल्यास मारहाण करण्याच्या धमक्या देण्यात आले. या कथित धमक्यांच्या निषेधार्थ मुंबई विद्यापीठासमोर आंदोलन करत दादा भुसे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी, “धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आमच्या १२ मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा दादा भुसे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा दिला. या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कल्याण-डोंबिवली महानगराध्यक्ष कमलेश उबाळे, आनंदराज घाटगे यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Dada BhuseEducationMaharashtraMumbai protestNEET Paper LeakPoliticalSamyak Students Blacken Dada Bhuseमुंबई
Previous Post

राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

Next Post

हिंगोलीला भूकंपाचा जोरदार हादरा; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये घबराट, घरांना तडे

Next Post
हिंगोलीला भूकंपाचा जोरदार हादरा; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये घबराट, घरांना तडे

हिंगोलीला भूकंपाचा जोरदार हादरा; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये घबराट, घरांना तडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा
बातमी

बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

by mosami kewat
September 10, 2026
0

- संजीव चांदोरकर  “नेपाळ जलप्रलय” निमित्ताने !  त्याची थरकाप उडवणारी दृश्ये / फोटो, आकडे बघत/ वाचत असतो, त्याची पुनरुक्ती नाही...

Read moreDetails
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

September 10, 2026
राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

September 10, 2026
ठाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय: ‘जय भीम GEN Z’ अभियानाच्या नियोजनासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना

ठाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय: ‘जय भीम GEN Z’ अभियानाच्या नियोजनासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना

September 10, 2026
प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”

प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”

September 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home