अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या टॉवर चौक येथील पक्ष कार्यालयात हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महानगराध्यक्ष हाजी मजहर खान यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, तालुकाध्यक्ष किशोर जामानिक, महानगराध्यक्ष हाजी मजहर खान, महानगर महासचिव गजानन (दादा) गवई, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, डॉ. मेश्राम, प्रदीप शिरसाट, आनंद डोंगरे, वसंतराव नागे, गजानन दांडगे, दीपक सावंग, दिलीप शिरसाट, शंकरराव इंगोले, सतीश चोपडे, पंकज दामोदर, संजय बुध, सुयोग आठवले, तानाजी मोरे, संदेश मोरे, संतोष गवई, शुद्धोधन इंगळे, एकनाथ शिरसाट, दामोदर जगताप, साबीर भाई, प्रा. सोनवणे, प्रा. सुजित वाहूरवाघ, अशोक लोणाग्रे, जनार्दन गवई, जनार्दन तायडे, शुद्धोधन ढवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




