Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

मुंबई : चेंबूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि. ३०) दुपारी सुमारे ३:३० वाजता, रोड क्रमांक ११ येथे एका शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत १० विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे वंचित बहुजन आघाडीने तीव्र संताप व्यक्त करत संबंधित बीएमसीच्या एम. पश्चिम विभागातील जबाबदार अधिकारी, वॉर्ड अधिकारी व इतर दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित धोकादायक वृक्षाची छाटणी करण्याबाबत अनेक वेळा बीएमसीच्या संबंधित वॉर्ड कार्यालयाकडे लेखी तक्रारी व निवेदने दिली होती. (Chembur Tree Fall kills Student)

Also Read : वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आणि एका निष्पाप विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, असे वंचित बहुजन आघाडीने सांगितले. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही एम. पश्चिम विभागाकडे विविध नागरी समस्या तसेच धोकादायक वृक्षांच्या छाटणीबाबत वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र, बीएमसी प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचे सांगितले. मुंबईत दरवर्षी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्यानंतरच प्रशासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव होते.

अशा निष्काळजीपणामुळे निरपराध नागरिकांचे जीव जात असून ही गंभीर बाब तातडीने थांबली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.bसंबंधित दोषी अधिकाऱ्यांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी, चेंबूर एम. पश्चिम विभागाच्या विरोधात तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. (Chembur Tree Fall kills Student)

Also Read : तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

दरम्यान, घटनेनंतर स्वप्निल गायकवाड (वॉर्ड १५० – प्रभाग समन्वयक), साईराज सदाफुले (वॉर्ड १५५ – प्रभाग समन्वयक), स्वप्निल भिसे, देवेश बागुल, हर्षद घाडगे, दिग्विजय कांबळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत घेतला असून, जखमी विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत करत आहेत.

Tags: bmcBMC NegligencechemburChembur Tree Fall kills StudentmumbaiMumbai newsRoad SafetySchoolBusStudent DeathTree CollapseVanchit Bahujan Aghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

Next Post

Aurangabad : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवली

Next Post
Aurangabad : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवली

Aurangabad : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home