Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

LPG Price Hike: LPG सिलेंडर पुन्हा महागला! घरगुती गॅसच्या दरात 29 रुपयांनी वाढ

mosami kewat by mosami kewat
June 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
LPG Price Hike: LPG सिलेंडर पुन्हा महागला! घरगुती गॅसच्या दरात 29 रुपयांनी वाढ

LPG Price Hike: LPG सिलेंडर पुन्हा महागला! घरगुती गॅसच्या दरात 29 रुपयांनी वाढ

LPG Price Hike : देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात आली आहे. या वाढीमुळे स्वयंपाकघराचा खर्च वाढणार असून कुटुंबांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 942 झाली आहे. कोलकात्यात ग्राहकांना आता 968 मोजावे लागणार आहेत. मुंबई आणि पुण्यात सिलेंडरचा दर 941.50 वर पोहोचला असून चेन्नईमध्ये तो 957.50 इतका झाला आहे. (LPG Price Hike)

Also Read  : ४९१.७० कोटींचा नियतव्यय मंजूर; अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह – राजेंद्र पातोडे

अलीकडच्या काळात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आधीच आर्थिक दबावाखाली आहेत. अशातच एलपीजीच्या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. अनेक कुटुंबांसाठी हा अतिरिक्त खर्च चिंतेचा विषय ठरत आहे. याआधी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली होती. मे महिन्यात मोठी दरवाढ झाल्यानंतर जूनच्या सुरुवातीलाही व्यावसायिक सिलेंडरचे दर पुन्हा वाढवण्यात आले होते. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि लघुउद्योग क्षेत्रावरही आर्थिक परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. (LPG Price Hike)

Also Read : आशिया कप २०२६: भारतीय अंडर-१८ पुरुष हॉकी संघ ठरला चॅम्पियन; जपानचा ४-१ ने पराभव!

दरम्यान, पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती, विशेषतः इराणमधील संघर्ष आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अनिश्चितता यामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींवर दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरगुती गॅसच्या नव्या दरवाढीमुळे महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Tags: Delhi LPG ratesDomestic gas cylinder priceLPGLPG price 2026LPG Price Hike
Previous Post

४९१.७० कोटींचा नियतव्यय मंजूर; अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह – राजेंद्र पातोडे

Next Post

ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

Next Post
ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home