Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

आशिया कप २०२६: भारतीय अंडर-१८ पुरुष हॉकी संघ ठरला चॅम्पियन; जपानचा ४-१ ने पराभव!

mosami kewat by mosami kewat
June 9, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
आशिया कप २०२६: भारतीय अंडर-१८ पुरुष हॉकी संघ ठरला चॅम्पियन; जपानचा ४-१ ने पराभव!

आशिया कप २०२६: भारतीय अंडर-१८ पुरुष हॉकी संघ ठरला चॅम्पियन; जपानचा ४-१ ने पराभव!

Hockey AsianCup 2026 : भारतीय पुरुष अंडर-१८ हॉकी संघाने आशियाई हॉकीमध्ये आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत २०२६ आशिया कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. जपानमधील काकामिगाहारा येथील कावासाकी हेवी इंडस्ट्रीज हॉकी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने यजमान जपानचा ४-१ असा पराभव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा आशिया कप ट्रॉफी आपल्या नावावर केली.

अंतिम सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू पूर्ती आशीष तानी याने अप्रतिम हॅटट्रिक करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. दुसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत आशीषने भारताचे खाते उघडले. (Hockey AsianCup 2026)

Also Read : इंस्टाग्रामचे ‘प्लस’ सब्सक्रिप्शन भारतात लॉन्च; अतिरिक्त फीचर्ससाठी दरमहा ₹299 शुल्क

पहिल्या क्वार्टरमध्ये जपानला संधी मिळाली तरी भारतीय बचावफळीने भक्कम कामगिरी करत त्यांना रोखून धरले. २८व्या मिनिटाला आशीषने दुसरा गोल झळकावत भारताची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर कर्णधार केतन कुशवाहाने शानदार फील्ड गोल करत भारताला ३-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली.

तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचा दबदबा कायम राहिला. ३४व्या मिनिटाला मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर आशीष तानीने अचूक फटका मारत आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि भारताची आघाडी ४-० अशी भक्कम केली. चौथ्या क्वार्टरमध्ये जपानच्या गाकू नुमाडाने सांत्वनपर गोल केला; मात्र भारतीय संघाच्या विजयावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. (Hockey AsianCup 2026)

Also Read : मुशाफिरी यात्रेतून भटके-विमुक्त समाजाच्या जनगणनेचा प्रश्न ऐरणीवर; 78 वर्षांनंतरही स्मशानभूमीची सोय नाही – ॲड. डॉ. अरुण जाधव

दरम्यान, या ऐतिहासिक यशानंतर हॉकी इंडियाने संघातील प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला १.५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. तसेच अंडर-१८ महिला आशिया कपमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूला १ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली.

Tags: ChampionshipGold medalHockey AsianCup 2026Hockey TeamIndia U-18 Men’s Hockey TeamIndian SportsJapan
Previous Post

आणि वनमंत्री म्हणाले, “जमलं तर यांची मदत करा!”

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आशिया कप २०२६: भारतीय अंडर-१८ पुरुष हॉकी संघ ठरला चॅम्पियन; जपानचा ४-१ ने पराभव!
क्रीडा

आशिया कप २०२६: भारतीय अंडर-१८ पुरुष हॉकी संघ ठरला चॅम्पियन; जपानचा ४-१ ने पराभव!

by mosami kewat
June 9, 2026
0

Hockey AsianCup 2026 : भारतीय पुरुष अंडर-१८ हॉकी संघाने आशियाई हॉकीमध्ये आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत २०२६ आशिया कप...

Read moreDetails
आणि वनमंत्री म्हणाले, "जमलं तर यांची मदत करा!"

आणि वनमंत्री म्हणाले, “जमलं तर यांची मदत करा!”

June 9, 2026
इंस्टाग्रामचे ‘प्लस’ सब्सक्रिप्शन भारतात लॉन्च; अतिरिक्त फीचर्ससाठी दरमहा ₹299 शुल्क

इंस्टाग्रामचे ‘प्लस’ सब्सक्रिप्शन भारतात लॉन्च; अतिरिक्त फीचर्ससाठी दरमहा ₹299 शुल्क

June 9, 2026
वसई-विरार: वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ‘घे भरारी तुझ्या स्वप्नांची’ उपक्रमाचा ५ वा वर्धापनदिन उत्साहात

वसई-विरार: वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ‘घे भरारी तुझ्या स्वप्नांची’ उपक्रमाचा ५ वा वर्धापनदिन उत्साहात

June 9, 2026
भारतीय रणरागिणींची ऐतिहासिक झेप! बांगलादेशचा ३-१ ने पराभव करत ७ वर्षांनंतर सॅफ चॅम्पियनशिपवर भारताचे नाव

भारतीय रणरागिणींची ऐतिहासिक झेप! बांगलादेशचा ३-१ ने पराभव करत ७ वर्षांनंतर सॅफ चॅम्पियनशिपवर भारताचे नाव

June 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home