Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; वंचित बहुजन युवा आघाडीचे पोस्टर आंदोलन

mosami kewat by mosami kewat
June 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; वंचित बहुजन युवा आघाडीचे पोस्टर आंदोलन
       
औरंगाबाद : NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांनी केली आहे. यासाठी शहरात पोस्टर लावून त्यांनी निषेध व्यक्त केला.

जाधव यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये NEET परीक्षेला बसलेल्या २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वारंवार समोर येणाऱ्या परीक्षा अनियमितता आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

पोस्टरच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. NEET परीक्षेत वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे आणखी किती विद्यार्थ्यांचे भविष्य आणि करिअर उद्ध्वस्त होणार, आणखी किती विद्यार्थ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले जाणार आणि आपल्या मुलांना गमावण्याचे दुःख आणखी किती पालकांना सहन करावे लागणार, असे सवाल करण्यात आले आहेत.

शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात तसेच या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संदीप जाधव यांनी केली आहे.

Tags: EducationMaharashtraNeet ExamPoliticalstudent
Previous Post

नॉर्वे चेस 2026 मध्ये प्रज्ञानंदचा ऐतिहासिक डंका; भारताला मिळवून दिले पहिले विजेतेपद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; वंचित बहुजन युवा आघाडीचे पोस्टर आंदोलन
बातमी

NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; वंचित बहुजन युवा आघाडीचे पोस्टर आंदोलन

by mosami kewat
June 7, 2026
0

औरंगाबाद : NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...

Read moreDetails
नॉर्वे चेस 2026 मध्ये प्रज्ञानंदचा ऐतिहासिक डंका; भारताला मिळवून दिले पहिले विजेतेपद

नॉर्वे चेस 2026 मध्ये प्रज्ञानंदचा ऐतिहासिक डंका; भारताला मिळवून दिले पहिले विजेतेपद

June 6, 2026
मनमाडमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन 

मनमाडमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन 

June 6, 2026
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना इशारा

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना इशारा

June 6, 2026
वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

June 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home