Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
June 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा
       
नागपूर : धापेवाडा येथील सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये काम करताना जखमी झालेल्या कामगाराला तात्काळ वैद्यकीय मदत व कायदेशीर नुकसानभरपाई देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित वंचित श्रमिक कामगार युनियनने केली आहे. यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक काळे यांना निवेदन देण्यात आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सुपुत्र निखिल गडकरी यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले आहे. या कंपनीत सिद्धार्थ देविदास गौरखेडे हे गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. 14 मे 2026 रोजी कंपनीत काम करत असताना त्यांच्या डाव्या पायावर 50 किलो वजनाची सोडा पावडरची पोती पडल्याने गंभीर अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाचे हाड मोडल्याचे सांगण्यात आले.

वंचित श्रमिक कामगार युनियनच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडून आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. तसेच अपघातानंतर कंपनीने जखमी कामगाराला कोणतीही आर्थिक किंवा वैद्यकीय मदत देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले आहे. 

या प्रकरणाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वंचित श्रमिक कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप काळे यांच्या नेतृत्वात कंपनी व्यवस्थापनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात कर्मचारी भरपाई कायदा, 1923 नुसार अपघातग्रस्त कामगाराला तात्काळ नुकसानभरपाई देणे, रुग्णालय, औषधोपचार व शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च कंपनीने उचलणे तसेच अपघात झाल्यापासून कामगार पूर्णपणे बरा होऊन कामावर रुजू होईपर्यंतचा संपूर्ण पगार देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या मागण्या तीन दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित श्रमिक कामगार युनियनने दिला आहे. निवेदन देताना जिल्हा महासचिव सी. सी. वासे, कार्यालयीन सचिव वैभव येवले, आयटी सेल प्रमुख शुभम वाहने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: nagpurPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार

Next Post

अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्या तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home