Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

परतूरमध्ये आचारसंहितेचा फज्जा! पाणी योजनेच्या उद्घाटनावरून वाद; वंचित बहुजन आघाडीची गुन्हा दाखल करण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
June 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
परतूरमध्ये आचारसंहितेचा फज्जा! पाणी योजनेच्या उद्घाटनावरून वाद; वंचित बहुजन आघाडीची गुन्हा दाखल करण्याची मागणी
       
जालना : परतूर तालुक्यातील नागापूर येथे आदर्श आचारसंहिता लागू असताना आयोजित करण्यात आलेल्या ‘१७३ गाव वॉटर ग्रीड जलशुद्धीकरण केंद्र’ उद्घाटन सोहळ्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना (पूर्व) जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, आचारसंहिता लागू असतानाही या शासकीय प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार बबनराव लोणीकर, विविध शासकीय अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याने वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

रामप्रसाद थोरात यांनी दिलेल्या तक्रारीत, उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आले. तसेच शासकीय बॅनरवर कोणतेही अधिकृत पद नसलेल्या राहुल लोणीकर यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याबरोबरच न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. दरम्यान, या तक्रारीच्या प्रतिलिपी राज्य निवडणूक आयुक्त तसेच विभागीय आयुक्त यांनाही पाठविण्यात आले आहे.

Tags: jalnaMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

Next Post

पंचशील ध्वज विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार!

Next Post
पंचशील ध्वज विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार!

पंचशील ध्वज विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!
बातमी

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

by mosami kewat
October 2, 2026
0

Satara : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

October 2, 2026
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

October 2, 2026
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 2, 2026
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home