Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन

mosami kewat by mosami kewat
June 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन
       
पैठण : महाराष्ट्रातील वाढती महागाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसणे तसेच राज्यातील पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पैठण (दि. 31) शहरातील बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सारंग यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आले.

आंदोलनादरम्यान वक्त्यांनी राज्यातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगितले. तसेच जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मौजे वझर येथील शेतकरी गोपीनाथ सरकटे यांचा डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावरील रांगेत उभे असताना मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे नमूद करून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या :

1. शेतमालाला हमीभाव देणारा कायदा तात्काळ लागू करावा.

2. शेतकरी गोपीनाथ सरकटे यांच्या मृत्यूप्रकरणी शासनाने जबाबदारी स्वीकारून त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.

3. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला सरसकट प्रतिक्विंटल 2,000 रुपये भाव द्यावा.

4. पेट्रोल-डिझेल टंचाईवर तातडीने उपाययोजना करून इंधन वितरण सुलभ व जलद करावे.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, जिल्हा सचिव बबलूशेठ बागवान, भगवान बनसोडे, भारत आठवले, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश बोरुडे, तालुका महासचिव अतुल गिरी, उपाध्यक्ष राम मिसाळ, शहर महासचिव दत्ता वाहुळे, छबुराव बनकर, ज्ञानदेव आडसूळ, दीपक गायकवाड, युवा आघाडीचे प्रमोद सूर्यवंशी, सुरेश केसापुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Tags: Fuel CrisisMaharashtraPaithanPaithanNewsprotestVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दीक्षाभूमीवरील भगव्या झेंड्याच्या पोस्टरप्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी

Next Post

नांदेड: चिखलीतील मराठा युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

Next Post
नांदेड: चिखलीतील मराठा युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

नांदेड: चिखलीतील मराठा युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन; पदाधिकारी उपस्थित!
बातमी

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन; पदाधिकारी उपस्थित!

by mosami kewat
June 1, 2026
0

औरंगाबाद : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जय टॉवर, पदमपुरा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून...

Read moreDetails
नांदेड: चिखलीतील मराठा युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

नांदेड: चिखलीतील मराठा युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

June 1, 2026
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन

June 1, 2026
दीक्षाभूमीवरील भगव्या झेंड्याच्या पोस्टरप्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी

दीक्षाभूमीवरील भगव्या झेंड्याच्या पोस्टरप्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी

June 1, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल!

May 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home