Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

केरळच्या राजकारणात मोठी खळबळ; माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ED चा छापा!

mosami kewat by mosami kewat
May 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
केरळच्या राजकारणात मोठी खळबळ; माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ED चा छापा!
       
केरळ : केरळच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना आज पहाटे घडली. राज्याचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अचानक छापा टाकत मोठी कारवाई सुरू केली. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर विजयन यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. तिरुवनंतपुरममधील विजयन यांच्या घरासह केरळभरात तब्बल 12 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. यामध्ये त्यांच्याशी संबंधित काही कार्यालये आणि भाड्याने घेतलेल्या मालमत्तांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

या धाडीनंतर केरळच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.  दुसरीकडे, ईडीकडून ही कारवाई आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण कारवाई कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड (CMRL) प्रकरणाशी संबंधित आहे. या कंपनीकडून बनावट खर्च दाखवून काही प्रभावशाली व्यक्तींना मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

या प्रकरणात माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या कन्या वीणा विजयन यांचे नावही समोर आल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. वीणा विजयन यांच्याशी संबंधित कंपन्या आणि कार्यालयांवरही ईडीने छापेमारी केली. तिरुवनंतपुरम, कोच्ची आणि कन्नूर या शहरांमध्ये ही कारवाई सुरू असल्याने केरळच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: Ed raidKerala ed raidKerala NewsMoney Launderingmoney laundering case
Previous Post

लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण?

Next Post

मुंबई हादरली! आग्रीपाड्यातील उच्चभ्रू वस्तीत ड्रग्जचा कारखाना; तरुणीसह तिघांना बेड्या, ५० कोटींचा मुद्देमाल जप्त

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई हादरली! आग्रीपाड्यातील उच्चभ्रू वस्तीत ड्रग्जचा कारखाना; तरुणीसह तिघांना बेड्या, ५० कोटींचा मुद्देमाल जप्त
बातमी

मुंबई हादरली! आग्रीपाड्यातील उच्चभ्रू वस्तीत ड्रग्जचा कारखाना; तरुणीसह तिघांना बेड्या, ५० कोटींचा मुद्देमाल जप्त

by mosami kewat
May 27, 2026
0

मुंबई : शहरातील आग्रीपाडा परिसरातील एका आलिशान निवासी टॉवरमध्ये एमडी ड्रग्जची गुप्त निर्मिती सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....

Read moreDetails
केरळच्या राजकारणात मोठी खळबळ; माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ED चा छापा!

केरळच्या राजकारणात मोठी खळबळ; माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ED चा छापा!

May 27, 2026
लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण?

लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण?

May 26, 2026
जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत? 

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत? 

May 26, 2026
तमाशा फडातील सोंगाड्या ते पद्मश्री रघुवीर खेडकर !

तमाशा फडातील सोंगाड्या ते पद्मश्री रघुवीर खेडकर !

May 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home